Jalgaon Municipality News : कालबद्ध पदोन्नत्यापासून वंचित; महापालिका कर्मचारी न्यायालयात

Jalgaon Municipality : भरती झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नत्यांचा लाभ न मिळाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal

Jalgaon Municipality News : तत्कालीन जळगाव नगरपालिकेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नत्यांचा लाभ न मिळाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तत्कालीन नगरपालिकेत १९९२ ते १९९७ दरम्यान कर्मचारी भरती झाली. तेव्हापासून काही कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या किंवा कालबद्ध पदोन्नत्या मिळालेल्या नाहीत. कालबद्ध पदोन्नत्या मिळाव्यात, यासाठी काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. (Municipal employees deprived of time bound promotion in court )

१९९७ मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना १२ वर्षांत म्हणजेच २००९ मध्ये कालबद्ध पदोन्नती मिळणे आवश्यक होते. त्यानंतर २०१६ च्या नवीन शासन निर्णयानुसार दहा वर्षांनी (२०१९ मध्ये) कालबद्ध पदोन्नती मिळाली पाहिजे होती. मात्र, महापालिकेच्या ३०० ते ४०० कर्मचारी आता निवृत्तीच्या उंबठ्यावर असून, काही निवृत्त झाले, तरी त्यांना कालबद्ध पदोन्नती वा नियमित पदोन्नती मिळालेली नाही. अशा कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने तत्काळ कालबद्ध पदोन्नत्या द्याव्यात, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipality : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नवीन सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड; नागरिकांचे हाल

दहा वर्षांनी मिळते कालबद्ध पदोन्नती

कालबद्ध पदोन्नतीसाठी पात्र ठरण्यासाठी २०१६ पूर्वी रूजू झाल्यापासून १२ वर्ष पूर्ण झालेले असावे. पदोन्नतीसाठीची शैक्षणिक अर्हता हवी, मक्तादायित्व व पाच वर्षांचे सीआर फॉर्म आवश्यक होते. पदोन्नतीसाठी २०१६ नंतर १० वर्ष पूर्ण झालेले असावे, पदोन्नतीसाठीची शैक्षणिक अर्हता पूर्ण पाहिजे, मक्तादायित्व व पाच वर्षांचे सीआर फॉर्म आवश्यक होते.

काय आहे नियम

कालबद्ध पदोन्नती देताना एक पदोन्नती झाली असेल, तर दोन कालबद्ध पदोन्नती देता येतात. दोन पदोन्नत्या झाल्या असतील, तर एकच कालबद्ध पदोन्नती देता येते. तीन पदोन्नत्या झालेल्या असतील, तर त्यांना कालबद्ध पदोन्नती देता येत नाही, असा नियम आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipality News : मोठ्या नाल्यांची सोमवारपासून सफाई; जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com