Jalgaon Municipality News : ‘मार्चएंड’मुळे पालिकांची करवसुलीसाठी कसरत

Jalgaon Municipality : जिल्ह्यातील पालिकांची ‘मार्चएंड’मुळे करवसुलीसाठी अक्षरश: कसरत सुरू असून, जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी नळ कनेक्शन कापण्यासह वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत.
Chief Sachin Raut, Head of Office Pankaj Sooryavanshi along with officers and employees recovery team.
Chief Sachin Raut, Head of Office Pankaj Sooryavanshi along with officers and employees recovery team.esakal

वरणगाव/ भुसावळ : जिल्ह्यातील पालिकांची ‘मार्चएंड’मुळे करवसुलीसाठी अक्षरश: कसरत सुरू असून, जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी नळ कनेक्शन कापण्यासह वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत. भुसावळ, वरणगाव, एरंडोल पालिकेने प्रशासनाने करवसुली मोहीम तीव्र केली आहे. भुसावळला उद्दिष्ट ४० कोटींचे असताना वसुलीचा टक्का मात्र पंधरा कोटींच्या आत आहे. (Jalgaon Municipality Due to March end Municipalities are struggling to collect taxes)

वरणगावला वसुलीला प्रतिसाद न देणाऱ्या दुकानदार, व्यावसायिक, शासकीय कार्यालयांवर मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी कारवाईचे आदेश दिल्याने शहरातील थकबाकीदारांनी धास्ती घेतली असून, कर भरण्यासाठी मिळकतधारकांनी पालिकेत गर्दी केली आहे. आर्थिक वर्षाअखेर जवळ आल्याने वरणगाव नगरपरिषद प्रशासनाने करवसुली मोहीम तीव्र केली आहे.

काही तांत्रिक बाबी पाहता करवसुली थकीत पडली आहे. उत्पन्न थकल्याने शहराच्या विकासकामाला तसेच विविध आर्थिक व्यवहार पालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराला काहीअंशी ‘ब्रेक’ मिळाला आहे. पालिकेत प्रशासकीय कारकीर्द व तत्कालीन मुख्याधिकारी समीर शेख यांची तडकाफडकी बदली झाल्याने व पालिकेला लवकर नवीन मुख्याधिकारी न लाभल्यामुळे त्याचा परिणाम करवसुलीवर झाल्याचे दिसून आले होते.

यासाठी नवनियुक्त मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी वसुली मोहीम गतिमान केली आहे. वसुली विभागवार पथक तयार करण्यात आले असून, वसुली न देणाऱ्या मिळकतधारकांवर कारवाई करण्याचे तसेच व्यावसायिक, शासकीय कार्यालयांवर धडक कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी राऊत यांनी पथकाला दिल्याने बहुसंख्य मिळकतदारांच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

तर श्रीधर कडू माळी यांचे नळकनेक्शन बंद करण्यात आले आहे. वरणगावला करवसुली पथकाच्या धडक कारवाईमुळे मिळकतधारकांनी चांगलीच धास्ती घेतली असून, मार्चअखेर किमान नव्वद टक्के करवसुली करण्याचा मानस मुख्याधिकारी राऊत यांनी व्यक्त केला आहे. (latest marathi news)

Chief Sachin Raut, Head of Office Pankaj Sooryavanshi along with officers and employees recovery team.
Jalgaon News : जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली!

तर श्री मॉल, जीत कॉर्नर, कन्हैया लॉन, शासकीय गुरांचा दवाखाना, ग्रामीण रुग्णाल, शासकीय विश्रामगृह, पोलिस ठाणे या खासगी व्यावसायिक व शासकीय कार्यालयांचा मिळकतकर कोट्यवधींच्या घरांत आहे. मात्र ती करवसुली लवकरच मिळणार असल्याचे नगरपरिषदेतील वसुली अधिकाऱ्यांनी सांगितले.

करवसुली पथकात मुख्याधिकारी सचिन राऊत, कार्यालय प्रमुख पंकज सूर्यवंशी, पाणीपुरवठा अभियंता पवार, वसुली अधिकारी नवरंगाबादी, वसुली लिपिक, गणेश कोळी, अनिल तायडे, संतोष वानखेडे, दीपक काळे, नीलेश झांबरे, प्रशांत माळी, राजेंद्र सोनार, रविकांत नारखेडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

थकबाकी वसुलीवर भर

वरणगाव नगरपरिषदेची चालू थकबाकी १ कोटी ८ लाख आहे. गेल्या दोन दिवसांपासून तीन ते साडेतीन लाख करवसुली करण्यात आली असून, मालमत्ता कर ४३ टक्के तर पाणीपट्टी ३६ टक्क्यापर्यंत झाली आहे. पालिकेची मागील थकबाकी १ कोटी ६३ लाख आहे.

Chief Sachin Raut, Head of Office Pankaj Sooryavanshi along with officers and employees recovery team.
Jalgaon Lok Sabha Election : गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी समन्वय राखा; चोपड्यात आंतरराज्य सीमा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com