Jalgaon News : पारोळा कब्रस्तानात जाणाऱ्या भुयारी मार्गात गुडघ्यावर पाणी; मुस्लिम समाजबांधवांना अडचणी

Jalgaon : राष्ट्रीय महामार्ग ५३च्या बायपास रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्तानात जाताना शहरातील मुस्लिम समाजबांधवांना भुयारी मार्गाचा उपयोग करावा लागतो.
Muslim members of the community on their way to the cemetery here on the subway.
Muslim members of the community on their way to the cemetery here on the subway.esakal

Jalgaon News : येथील राष्ट्रीय महामार्ग ५३च्या बायपास रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्तानात जाताना शहरातील मुस्लिम समाजबांधवांना भुयारी मार्गाचा उपयोग करावा लागतो. मात्र, सध्या पावसाचे दिवस असल्याने या भुयारी मार्गात गुडघ्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे दफनविधीसाठी आलेल्या समाजबांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून संबंधित विभागाने याबाबत तातडीने आवश्‍यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी मुस्लिम समाजबांधवांनी केली आहे. (Muslim members of community on their way to cemetery here on subway )

शहरातील मुस्लिम समाजबांधवांना वंजारी रोडलगत असलेल्या कब्रस्तानात दफनविधीसाठी जावे लागते. त्यामुळे बायपासचा भुयारी मार्ग (अंडरपास) हा एकमेव मार्ग क्रबस्तानकडे जाणारा आहे. मात्र, पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने जनाजा नेण्यासाठी पाण्यातूनच जावे लागत आहे. या भुयारी मार्गाबाबत'संबंधित विभागाने योग्य ती उपाययोजना तातडीने करावी, अशी मागणी मुस्लिम समाजबांधवांकडून केली जात आहे. कुरेशी शेख इक्बाल शेख इस्माईल यांचे अल्पआजाराने नुकतेच निधन झाले. (latest marathi news)

Muslim members of the community on their way to the cemetery here on the subway.
Jalgaon News : जामनेरच्या 8 खेळाडूंचा स्केटिंग स्पर्धेत विश्वविक्रम; ‘गीनिज बुक’मध्ये नोंद

त्यांची जनाजा (अर्थी) घेऊन जाताना समाजबांधवांना क्रबस्तानात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जनाजात शेकडो समाजबांधव राहतात. म्हणून त्यांना बायपासवरून यावे लागते. कारण मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात राहत असल्याने मार्ग ओलांडताना बराच वेळपर्यंत थांबावे लागते. म्हणून याबाबत बायपासच्या संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्‍यक ती उपाययोजना तातडीने करावी, अशी मागणी समाजबांधवांकडून केली जात आहे.

Muslim members of the community on their way to the cemetery here on the subway.
Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सुटेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com