National CA Day : गरज 25 हजारांची, तयार होताहेत 10 हजार ‘सीए’! GSTनंतर देशात ‘सीएं’ची वाढती गरज; करिअरसाठी उत्तम पर्याय

Jalgaon News : केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही ‘सीए’ला ८ ते २५ लाखांचे पॅकेज मिळू शकते, असा विश्‍वास ‘सीए’ विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष हितेश आगीवाल यांनी व्यक्त केला.
Chartered accountant
Chartered accountantesakal
Updated on

जळगाव : राष्ट्रनिर्मिती, जडणघडण, बळकट अर्थव्यवस्था निमिर्तीसाठी भारतीय सनदी लेखापाल (सीए) हे मोलाची भूमिका बजावितात. देशाला २५ हजार ‘सीएं’ची गरज आहे. मात्र, केवळ १० ते १२ हजार तरुण ‘सीए’ होत आहेत. ‘सीए’ करिअरच्या दृष्टीने सर्वोच्च आहे.

मात्र, त्यासाठी ‘सीए’ अभ्यासक्रम कठोर मेहनत, जिद्द, चिकाटीने पूर्ण करावा लागतो. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही ‘सीए’ला ८ ते २५ लाखांचे पॅकेज मिळू शकते, असा विश्‍वास ‘सीए’ विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष हितेश आगीवाल यांनी व्यक्त केला. (jalgaon National CA Day Great choice for career)

सनदी लेखापाल अर्थात ‘सीए’ दिन सोमवारी (ता. १) साजरा होत आहे. त्यानिमित्त श्री. आगीवाल ‘सकाळ’शी संवाद साधत होते. ‘सीए’ची परीक्षा ‘आयसीएआय’तर्फे देशभरात एकाचवेळी एकाच दिवशी घेतली जाते. ‘आयसीएआय’चे प्रचंड नियोजन असते. यामुळे सी.ए. परीक्षेचे पेपर लीक होत नाहीत, अन उशिराही दिले जात नाहीत. ‘सीए’ परीक्षा फार कठीण आहे, असा संभ्रम नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये आहे.

मात्र, तसे काही नाही. देशाच्या निर्मितीत ‘सीए’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांना संबंधित क्षेत्राचे सखोल, बिनचूक ज्ञान असायला हवेच. तरच ते कायदे बनविताना त्यांचे ज्ञान उपयोगात आणू शकतील. ज्ञानच जर कच्चे, चुकीचे असेल तर ते कायदे बनविण्यात भूमिका कशी पार पाडू शकणार? ‘सीए’ होण्यासाठी कोट्यवधी रुपये लागत नाहीत, तर अभ्यास, कठोर मेहनत व चिकाटी लागते.

श्री. आगीवाल म्हणाले, की ‘सीए’ देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी विविध स्वरूपाचे कर संकलन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर (जीएसटी), प्राप्तिकर, टोल आदींद्वारे उत्पन्नाचे स्रोत तयार करून राज्याला, देशाला उत्पन्नाच्या स्रोतांचे मार्ग दाखवितात. ‘सीएं’च्या नियोजनानुसार देशात दीड लाख कोटीचे ‘जीएसटी’ संकलन होते. प्राप्तिकरही मोठ्या स्वरूपात सरकारला मिळतो. ‘सीए’ करदात्यांमध्ये कराविषयी जनजागृतीचे काम करतात. (latest marathi news)

Chartered accountant
National Chartered Accountants Day 2024 : भारतातील यशस्वी CA, कुणी आहे मंत्री तर कुणी आहे उद्योगपती.!

‘सीएं’च्या सहीची महती

कोरोनानंतरच्या काळात जग अतिशय जवळ आले आहे. ‘सीए’ आता जळगावमध्ये बसून परदेशातील कंपनीची ‘सीए’संबंधित कामे करू शकतात. अमेरिका, दुबई, गल्फकंट्रीसारख्या देशात ‘सीएं’ची संख्या कमी आहे. ती भारतातील ‘सीएं’चे आउटसोर्सिंग करतात.

त्यांच्या कंपनीचा लेखाजोखा, आॅडिट आदी कामे करवून घेतात. शासनस्तरावर प्रत्येक क्षेत्रात ‘सीएं’ची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१७ मध्ये म्हणाले होते, की ‘सिग्नेचर ऑफ सी.ए. इज पॉवरफूल द्यान प्राय-मिनीटर’ एवढे महत्त्व ‘सीएं’च्या सहीला आहे. त्यांच्या सहीवर कंपन्या विश्‍वास ठेवून इतर कंपन्यांशी करार करतात.

आकडे बोलतात..

* भारतातील संख्या- ४ लाख ८ हजार

* महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधील ‘सीए’- १ लाख २५ हजार

* मुंबईतील संख्या- ४८ ते ४५ हजार

* जळगाव जिल्ह्यातील ‘सीए’- ६००

* प्लेसमेंटनंतर फ्रेशरला मिळणारे वेतन- ८ ते ९ लाख प्लस

* परदेशात मिळणारे वेतन- २५ लाख प्लस

"‘सीए’ हे देशाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देतात. ‘जीएसटी’ आल्यापासून ‘सीएं’ची मागणी वाढली आहे. प्रचंड आत्मविश्‍वास, दृढ निश्‍चय, चिकाटी असणाऱ्यांसाठी ‘सीए’ क्षेत्र ‘स्काय इज लिमिट’ आहे."- हितेश आगीवाल, ‘सीए’ विद्यार्थी शाखाध्यक्ष

Chartered accountant
Maharashtra Agriculture Day: शेतीकामांसाठी अडीच लाखापर्यंत अनुदान : कृषी विभाग; सावकाराकडे व्याजाने पैसे घेण्याची गरज नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.