Jalgaon News : जिल्ह्यात 37 हरितगृह, शेडनेट, 3 मधुमक्षिका पालन प्रकल्प ‘कागदा’वर

Jalgaon News : जिल्हयात एकूण ३२८ शेतकऱ्यांना हरितगृह व शेडनेटधारक लाभार्थ्यांच्या फेरतपासणीत २९१ हरितगृह व शेडनेट सुस्थितीत जागेवर आढळले.
Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting of Agriculture Department.
Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting of Agriculture Department.esakal

Jalgaon News : जिल्हयात एकूण ३२८ शेतकऱ्यांना हरितगृह व शेडनेटधारक लाभार्थ्यांच्या फेरतपासणीत २९१ हरितगृह व शेडनेट सुस्थितीत जागेवर आढळले. तर त्यातील ५ कोटी ७४ लाख २१ हजार रुपये खर्चाची अनुदान गटातील ३७ हरितगृह व शेडनेट मात्र आढळून आले नाहीत. ३ मधुमक्षिका पालन प्रकल्प जागेवर आढळले नाही. (37 greenhouse, shade net, 3 beekeeping projects in jalgaon district only on paper)

तीन्ही मधुमक्षिका पालन प्रकल्पांची (वसुल पात्र रक्कम रुपये ४ लाख ९५ हजार रुपये) असून ते जागेवरच नसल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा बसवून वसूली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी आधिकरी व शासकीय सदस्यांना आमंत्रित करुन विविध शासकीय समित्यांची मासिक आढावा बैठकीत हा प्रकार उघडकीस आला.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक बाबीतील संरक्षित शेती घटकांतर्गत मोका तपासणी होऊन अनुदान दिलेल्या हरितगृह व शेडनेट गृह यांची १०० टक्के फेर तपासणीचा यावेळी अहवाल सादर करण्यात आला.

या अहवालानुसार एकूण ३२८ शेतकऱ्यांना हरितगृह व शेडनेट यांचा लाभ दिलेला असून त्यापैकी ३७ हरितगृह व शेडनेट (वसुल पात्र रक्कम रुपये ५ कोटी ७४ लाख २१ हजार २८५) उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या अहवालानुसार अनुदान दिलेल्या गटात आढळून आलेले नाहीत.

Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting of Agriculture Department.
Jalgaon News : नवा गहू बाजारात, 3 हजारापर्यंत भाव

तीन शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रकल्पाचा लाभ दिला मात्र त्यापैकी तिन्ही प्रकल्प (वसुल पात्र रक्कम रुपये ४ लाख ९५ हजार रुपये) जागेवर नसल्याचे आढळून आले. हरितगृह, शेडनेट व मधुमक्षिका पालन हे घटक जागेवर न आढळल्याने संबधितांना बजावलेल्या वसुली नोटीसचा कालावधी संपल्यानंतर जे शेतकरी वसुलीची रक्कम भरणार नाहीत अशा लाभार्थ्याकडून रक्कम वसुल करण्यात यावी.

वसुल न झाल्यास संबधितांच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. येत्या २६ फेब्रुवारीला पून्हा एकदा जिल्हाधिकारी आढावा घेणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

आजच्या बैठकीत, दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना गौरविण्यात येईल असाही र्निणय जिल्हाधिकारी प्रसाद यांनी निर्णय घेतला.

कृषी अधिकाऱ्यांचा गुणगौरव

जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांचे २०२३-२४ गोपनीय अहवालाची माहिती भरतांना योजनेची प्रगतीच्या आधारावर १ ते १० गुणांकन देण्यात यावे. या योजनेतील तालुक्याच्या प्रगतीच्या आधारावर उत्कृष्ट तालुका कृषी अधिकारी यांची क्रमवारी ठरवून उत्कृष्ट अधिकारी जाहीर करुन त्यांचा गौरव करण्यात यावा,अशा सुचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या.

Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting of Agriculture Department.
Jalgaon News : जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com