Jalgaon News : दुसरा विवाह करूनही पहिलीतच जीव गुंतला! कौटुंबिक वादातून पत्नीचा छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman crying

Jalgaon News : दुसरा विवाह करूनही पहिलीतच जीव गुंतला! कौटुंबिक वादातून पत्नीचा छळ

जळगाव : नशिराबाद (ता. जळगाव) येथील माहेरवाशीण विवाहितेचा कौटुंबिक वादातून छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या पत्नीला सोडून दिल्यावर पुन्हा घरोबा करणाऱ्या नवरोबासह सासरच्या मंडळीविरुद्ध पीडितेने तक्रार दिली आहे.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

नशिराबाद येथील माहेर असलेल्या सालेहा मोहसीन मणियार (वय २६) यांचा शिंदखेडा (जि. धुळे) येथील मोहसीन खान रऊफ खान मणियार यांच्याशी विवाह झाला आहे. पहिल्या पत्नीशी कुठलेही संबंध ठेवू नये, यासाठी सालेहा यांनी पती मोहसीन यांना विरोध केला. यावरून पतीसह सासरच्या मंडळींनी सालेहा यांना शिवीगाळ करून छळ केला.

हेही वाचा: Crime : बालपणाचे मित्र बनले पक्के वैरी; मित्रांकडूनच खुनाचा जळगाव पॅटर्न

छळ असह्य झाल्याने सालेहा माहेरी निघून आल्या. याबाबत शनिवारी (ता. १२) सालेहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मोहसीन, सासरे रऊफ खान मणियार, सासू नजमाबी खान मणियार, जेठ मुश्ताक खान मणियार, नणंद फरजानाबी फारुख मणियार व मोहंमद फारुख अब्दुल सत्तार (सर्व रा. शिंदखेडा, जि. धुळे) यांच्याविरोधात नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक अतुल महाजन तपास करीत आहे.