

Jalgaon Municipality News : शहराचे सौंदर्यीकरण, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, वाढीव हद्दीत दिवाबत्ती,पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी ‘ट्री बँक’, शहरात चोवीस पाणी पुरवठा असा संकल्प आयुक्त तथा प्रशासक विद्या गायकवाड यांनी केला. त्यांनी आज शहराचा २०२४-२५ चा ९७२ कोटी २७ लाखाचा सुधारित व करवाढ नसलेला अर्थसंकल्प महासभेत सादर केला आहे.
मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी स्थायी समितीत सादर केलेल्या ९८१ कोटी ४७ लाखाच्या अंदाज पत्रकात सुधारणा करीत, महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी ९७२ कोटी २७ लाखाचे अंदाजपत्रक सादर केले.
उपायुक्त निर्मला गायकवाड, मुख्यलेखाधिकारी वानखेडे,उपायुक्त अविनाश गांगोडे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे , पाणी पुरवठा अभियंता संजय नेमाडे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, नगररचना अधिकारी सुनील गोराणे आदी उपस्थित होते.
वास्तविक अंदाजपत्रक
डॉ. गायकवाड म्हणाल्या की, फुगवटा नसलेले वास्तविक अंदाजपत्रक आहे. जमा होणाऱ्या महसूली उत्पन्नावरच खर्च दाखविला आहे. शहरातील नवीन रस्त्यासाठी १५ कोटीं, नवीन गटारासाठी ६ कोटी, बालगंधर्व खुले नाट्यगृह व्यवस्था व दुरुस्ती ५ लाख , सार्वजनिक उद्याने व्यवस्था व दुरुस्ती १ कोटी ५० लाख , प्रशासकीय इमारत व्यवस्था व दुरुस्ती ६० लाख , रस्ता व्यवस्था व दुरुस्ती ३ कोटी ४० लाख ,
गटार व्यवस्था व दुरुस्ती २ कोटी, पुतळे व्यवस्था व दुरुस्ती दहा लाख, शहरात दिशा दर्शक फलक लावणे २५ लाख, क्रिडा स्पर्धा, महापौर चषक १० लाख, पर्यावरण सुधारणा व नवीन वृक्ष लागवड ६५ लाख, आपत्ती व्यवस्थापन निवारण १३ लाख, डिजिटल शाळा करणे व आदर्श शाळा योजना १० लाख, नगरसेवक, पदाधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण ३० लाख ,
नगरसेवक स्वेच्छा निधी व प्रभाग विकास निधी १२ कोटी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरक ९ कोटी, निवृत्ती वेतनधारक ७ वा वेतन आयोग फरक १.५० कोटी, नविन बगीचे ५० लक्ष, फायर स्टेशन बांधणे १ कोटी, नविन वाहन खरेदी २ कोटी, ईगव्हर्नंस साहित्य व व्यवस्थापन १.५० कोटी, भूसंपादन मोबदला १६ कोटी,
नविन पुतळे उभारणे २ कोटी, नविन विद्युत पोल उभारणे, वीज वाहिनी स्थलांतर १ कोटी, नविन लाईन व्यवस्था बसविणे २५ लाख, जल शुध्दीकरणासाठी २.५० कोटी, नविन जलवाहिणी व्यवस्था व दुरुस्ती ३.५० कोटी, शासन अनुदानित योजनांसाठी महापालिकेच्या हिश्शापोटी ५५ कोटी, पाणीपुरवठा योजना अनुदान ३.२५ कोटी अशी तरतूद आहे.
चोवीस तास पाणी पुरवठा
अंदाजपत्रकात शहर सौंदर्यीकरणाचा संकल्प असल्याचे स्पष्ट करीत त्या म्हणाल्या की, अमृत योजनेतून जळगावकरांना लवकर चोवीस तास पाणी पुरवठ्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी नवीन करवाढ नसेल. प्रदूषण नियंत्रणासाठी झाडे लावून जोपासना करण्यासाठी नागरिकांसाठी ‘ट्री बँक’हा नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कचरा प्रदूषणापासून मुक्तीसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरळीत करण्यात येईल,शहरातील वाढीव हद्दीत दिवाबत्ती करण्यात येईल, तर नागरिकांच्या सर्व तक्रारी ऑनलाइन नोंदवून निराकरण करण्यात येईल.
घरपट्टी वसुली तीन टप्प्यात
गेंदालाल मील, शिवाजी नगर, वाल्मीक नगर, खेडी,प्रिंप्राळा येथील घरकुल धारकांकडून पाच रुपये सेवा शुल्क आकारण्यात येते. परंतु रक्कम भरणा केला जात नाही. त्यामुळे १७ कोटी थकबाकी आहे. ती वसुली करण्यासाठी नवीन पाणी कनेक्शन देताना त्यांना घरपट्टी भरण्यासाठी तीन टप्पे करून वसुली होईल.
२३२ कोटी भाडे वसुली
महापालिकेच्या संकुलातील गाळेभाडे ही उत्पन्नाची मोठी बाजू आहे. परंतु गेल्या दहा बारा वर्षापासून २३२ कोटी रक्कम थकबाकी आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांची नुकसान भरपाई रक्कम मोठ्या प्रमाणात येणे असून ती वसुलीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. इतर मालमत्ता कराचीही आर्थिक वर्षात जास्तीत जास्त वसुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंदाजपत्रक
भूसंपादन मोबदला १६ कोटी
नवीन रस्त्यासाठी १५ कोटी
नगरसेवक स्वेच्छा निधी १२ कोटी
नवीन गटारासाठी ६ कोटी
अग्निशमन केंद्र उभारणे १ कोटी
पर्यावरणासाठी ट्रि बॅक ६५ लाख
शहरात दिशादर्शक फलक २५ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.