

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
sakal
पारोळा/जळगाव: वेल्हाणे (ता. पारोळा) येथे लग्नानंतर नवविवाहितेने जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन पतीसह तिघांना ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पारोळा पोलिसांनी संशयित तरुणींना धुळ्यातील निमगूळपर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. विशेष म्हणजे लग्नासाठी एजंटच्या माध्यमातून अडीच लाख रुपये देऊन परप्रांतातून या मुली आणण्यात आल्या होत्या.