Jalgaon NMU News : आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी ‘उमवि’ चा क्रिकेट संघ रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Poet Bahinabai Chaudhary with the team of North Maharashtra University coach Prof. Dr. Dr. Sachin Zope, Director of Sports. Dinesh Patil.

Jalgaon NMU News : आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी ‘उमवि’ चा क्रिकेट संघ रवाना

जळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय शेखावाटी विद्यापीठ, सीकर (राजस्थान) येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय क्रिकेट (पुरुष) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ रवाना करण्यात आला.

स्पर्धा १ ते १० फेब्रुवारीदरम्यान होणार असून, ‘उमवि’च्या संघाचा पहिला सामना भगवान महावीर विद्यापीठ, सुरत यांच्याशी होणार आहे. ( Jalgaon NMU News Cricket team of NMU leaves for inter university tournament Jalgaon News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

संघाचे सराव शिबिर अनुभूती शाळेच्या मैदानावर झाले. प्रा. डॉ. सचिन झोपे आणि जैन स्पोर्ट्‌स अकादमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी कौतुक केले.

असा आहे संघ

तुषार चोरडिया (कर्णधार), शुभम शर्मा (उपकर्णधार), संकेत पांडे, तनेश जैन, पीयूष सोहने, सौरभ सिंग, रिषभ करवा, सिद्धेश देशमुख, नचिकेत ठाकूर, अमेय कोळी, तुलजेश पाटील, ऋग्वेद बाविस्कर, अरविंद थापा, तन्मय शहा, प्रतीक शिंदे, रोहन भोळे.

टॅग्स :CricketJalgaonnmu