.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांच्या मृतदेहाचा अद्यापही शोध लागलेला नाही. दरम्यान गुन्ह्यातील इतर पुरावे आणि संशयितांच्या चौकशीसाठी दोघा संशयीतांना शनिवारी (ता.१९) संध्याकाळी तालुका पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयीतांना कोठडीत रवाना केले आहे. मूळ जळगावातील रहिवासी आणि नुकत्याच नाशिक येथे मुलाकडे स्थायिक झालेल्या स्नेहलता चुंबळे या जिल्हा परिषद कर्मचारी २० ऑगस्ट रोजी जळगावला ग.स. सोसायटीच्या वार्षिक सभेसाठी आल्या होत्या. (nurse murder case suspect is on remand after body is missing )