

The excavation pit for railway work near Goradkheda village on the Pachora-Chandwad National Highway, where a fatal accident occurred.
esakal
पाचोरा: पाचोरा ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रेल्वेच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. गोराडखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात खडकदेवळा येथील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी गेल्या १५ दिवसांत तीन अपघात झाले आहेत. वारंवार अपघात होत असूनही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.