
जळगाव : पारोळ्यात दीडशे किलो प्लॅस्टिक कॅरिबॅग जप्त
पारोळा : प्लॅस्टिकवर सर्वत्र बंदी असताना शहरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर होताना दिसत आहे. याबाबत पालिकेने कडक भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांनी रविवारच्या सुट्टीचा दिवस असताना देखील चक्क बाहेरगावाहून येणारा ट्रान्स्पोर्टद्वारे प्लास्टिक कॅरीबॅग आणल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
मुख्याधिकारी ज्योती भगत, कार्यालयीन अधीक्षक संगमित्रा संदानशिव, शहर समन्वयक रवींद्र पाटील, पालिका कर्मचारी किशोर चौधरी, जितेंद्र चौधरी, विश्वास पाटील, आकाश कंडारे, अनिल नरवाडे यांच्या पथकाने पीर दरवाजाजवळ उतरत असलेल्या ट्रान्स्पोर्टच्या मालाची तपासणी करून वाहनात आलेला प्लास्टिक कॅरीबॅगचा तब्बल शंभर ते दीडशे किलो माल ताब्यात घेऊन तो जप्त केला.
या वेळी मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी कॅरीबॅग न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पर्याय म्हणून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करून त्या वस्तू नगरपालिकेच्या प्रत्येक विभागनिहाय ठेवून तयार करणाऱ्या विद्यार्थ्यास किंवा व्यक्तीस प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव पालिकेमार्फत करण्यात येणार आहे.
Web Title: Jalgaon Parola One And Half Kilos Plastic Carry Bags Confiscated
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..