
यावल : येथील ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांसह कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करावी, याबाबत वारंवार मागणी, निदर्शने करूनही त्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. म्हणून सोमवार(ता.१२)पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. समस्यांचे निराकरण न झाल्यास ठिय्या आंदोलनाचे रुपांतर बेमुदत उपोषणात करण्यात येईल, असा इशारा निळे निशान संघटनेने दिला आहे. (Patients suffer due to lack of health facilities situation in Yaval hospital)