Latest Marathi News | जळगाव : पिंप्राळा रेल्वे गेट आजपासून कायमचे बंद होणार; उड्डाणपूल होईपर्यंत गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon news

जळगाव : पिंप्राळा रेल्वे गेट आजपासून कायमचे बंद होणार; उड्डाणपूल होईपर्यंत गैरसोय


जळगाव :
येथील पिंप्राळा रेल्वे गट सोमवार (ता. १२)पासून कायमस्वरूपी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. रेल्वेगेट पलीकडे जाणाऱ्या अनेक परिसरात जाण्यासाठी १९६० मध्ये हे गेट सुरू करण्यात आले होते. शिवाजीनगर उड्डाणपूल वाहतुकीस खुला केल्याने रेल्वे प्रशासनाने हे गेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पर्यायी वाहतूक बजरंग बोगद्यातून होणार आहे. तर मोठ्या वाहनांना शिवाजीनगर पुलावरून जाण्याचा मार्ग मोकळा आहे.

जोपर्यंत पिंप्राळा रेल्वेगेटवर उड्डाणपूल पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
मुंबई-भुसावळ रेल्वे सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांनंतर भोईटेनगर, पिंप्राळा भागातून शहरात येणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर १९६० मध्ये रेल्वे गेट सुरू करण्यात आले. तेव्हापासून हे गेट सुरूच होते.

हेही वाचा: बिबट्याच्या भितीने नदीत उडी मारली अन्... लताबाईंचा अंगावर रोमांच आणणारा प्रवास


रेल्वे प्रशासनाने देशभरातील रेल्वेगेट बंद करून त्याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावमधील असोदा रेल्वेगेट, पिंप्राळा रेल्वेगेट, सूरत रेल्वेगेटचा त्यात सामावेश होता. सध्या असोदा व पिंप्राळा रेल्वेगेटजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पिंप्राळा परिसरात, शिवाजीनगर परिसरात जाण्यासाठी आता शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम झाले आहे. यामुळे तो पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. यामुळे सोमवारपासून (ता. १२) पिंप्राळा रेल्वेगेट वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद केले जाणार आहे. मुंबई, पुणेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रेलवेगाड्यांची संख्या अधिक होती.

शिवाय रेल्वे मालवाहतुकीच्या गाड्या जेव्हा ये-जा करीत तेव्हा तेव्हा पिंप्राळा रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद केले जात असे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. आगामी काही महिन्यात पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे पूर्ण झाल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. तोपर्यंत भोईटनगर, प्रेमनगर, पिंप्राळा आदी परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

हेही वाचा: वीज कोसळल्याने भरपावसात पेटले झाड; मोठा अनर्थ टळला


बजरंग पुलाचा पर्याय

प्रेमनगर, भोइटेनगरातील नागरिकांना वाहतुकीसाठी बजरंग बोगद्याचा पर्याय आहे. मात्र येथून केवळ दुचाकी, कार जाऊ शकतील. मोठी अवजड वाहनांसाठी त्यांना शिवाजीनगर पूल किंवा महामार्गावरून जाण्याचा पर्याय आहे. मात्र तोही लांब अंतराचा असल्याने इंधनाचा खर्च अधिक येणार आहे.

मालधक्क्याची वाहतूक वळविली
मालधक्क्याची वाहतूक महामार्गावरून, तर भोईटेनगर परिसरातील मालधक्क्यावरील वाहनांची वाहतूक रिंगरेाडमार्गे होत होती. यामुळे वाहतुकीची कोंडी पिंप्राळा रेल्वेगेटवर अधिक होत होती. आता ही मालवाहतूक बंद होऊन गुजराल पेट्रोलपंपमार्गे जुन्या महामार्गाने मालधक्क्यावर येईल.

हेही वाचा: सायकल दुरुस्ती करणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टरेट

Web Title: Jalgaon Pimprala Railway Gate Will Be Permanently Closed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon