PM Modi
PM Modiesakal

Jalgaon PM Modi Daura: महायुतीला मोदींचा दौरा लाभदायी ठरणार? पंतप्रधान रविवारी जळगावात; ‘लखपती दिदी’ योजनेचा होणार प्रारंभ

PM Modi Daura : ‘लखपती दिदी’ योजनेसाठी होणारा मोदींचा हा दौरा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला हात देणारा ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Published on

Jalgaon PM Modi Daura : लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला महाराष्ट्रातून मोठा फटका बसला. त्यानंतर ‘डॅमेज कंट्रोल’ म्हणून सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणली खरी; तथापि, त्याचा लाभ पदरात पाडून घेतानाही त्यांची दमछाक होताना दिसते.

अशातच सरकारला अडचणीच्या ठरतील अशा अनपेक्षित घटनाही राज्यात घडत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव दौरा होतो आहे. ‘लखपती दिदी’ योजनेसाठी होणारा मोदींचा हा दौरा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला हात देणारा ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मात्र कंबर कसलेली आहे. (PM daura on Sunday)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com