
जळगाव : येत्या मंगळवारी (ता..१७) अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यासाठी जळगाव शहरातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांसह पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकी शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. तसेच विसर्जन मिरवणुक मार्गावर खास ८२ उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याद्वारे उपद्रवींसह टवाळखोरांवर लक्ष राहणार आहे. त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे कोर्ट चौकातील जीएस मैदानावरून नंबर लावावा लागणार आहे. (Police force ready with Ganesh Mandal workers for preparation for ganesh visarjan )