Crime News : हिमाचलमध्ये हत्या करून फरार .चौघे बिहारी अटकेत; जळगावात मोबाईल विकायला उतरताच पडल्या बेड्या

Four Suspects Held by Jalgaon Police :हिमाचलमधून फरार झालेल्या चार संशयितांना जळगावात अटक; मोबाईल विक्रीसाठी उतरले अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Four Suspects Held by Jalgaon Police

Four Suspects Held by Jalgaon Police

esakal

Updated on: 

जळगाव, : हिमाचल प्रदेशात मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणातील चार संशयित गोवा एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, पैसे संपल्याने मोबाईल विक्रीसाठी जळगावात उतरले अन्‌ जळगाव पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. अटकेतील चौघे बिहार येथील रहिवासी असून त्यांना लवकरच हिमाचल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुकेशसोबत चौघेही एकत्र दारू पित असताना वाद होऊन त्याने संशयिताना बहिणीवरून शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या हाणामारीत चौघांनी मुकेश कुमार यांचा (ता.२९) खून करुन चौघांनी धूम ठोकली. या प्रकरणी (ता.३०) हिमाचल पोलिसांत बुधवारी (ता. ३०) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांकडून देण्यात आली आहे.

असे झाले फरारी

मुकेशचा खून केल्यानंतर संशयित किसंपूर येथून सकाळी सुमारे अकराला निघून अंबाला येथे आले. तेथून दुपारी सुमारे साडेचारला मुंबई एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान पैसे संपल्याने व भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी ते जळगाव येथे उतरल्याची माहिती तपासात समोर आली.

जळगाव पोलिसांशी संपर्क

हिमाचल प्रदेश पोलिसांकडून या चौघांचा शोध सुरू होता. संशयितांचे लाइव्ह लोकेशनवर हिमाचल पोलिस लक्ष ठेऊन असताना संशयित शनिपेठ पोलिस ठाणे हद्दीत असल्याचे कळताच ही माहिती हिमाचल पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना दिली.

तीनवेळा हुलकावणी;चौथ्यांदा बेड्याच

निरीक्षक जयस्वाल यांना मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकातील पोलिस कर्मचारी विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, नीलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने व रवींद्र साबळे यांनी तातडीने शोधमोहीम राबविली. मात्र, तीन वेळा संशयित पोलिसांना हुलकावणी देत निसटले. अखेर चौथ्यांदा शिताफीने कारवाई करत चौघांना शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताब्यात घेतले. त्यांची नावे चंदन कुमार, रोशन गोगल मुखिया (दोघे रा. कुतुबपूर, मुझफ्फरपूर, बिहार), संतोष कुमार संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर) व अजितकुमार जोगा मेहतो (रा.पंडरक, जि. पाटणा, बिहार) अशी आहेत.

चौघांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती असून, त्यांचा ताबा घेण्यासाठी हिमाचल पोलिस जळगावकडे रवाना झाले आहेत.

गोव्याला जाण्याचा होता बेत

घटनेनंतर संशयित किसंपूर येथून सकाळी अकराला निघाले. अंबाला येथे पोहोचल्यानंतर दुपारी साडेचारला मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईहून गोव्याला जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, प्रवासात पैसे संपल्याने तसेच भूक लागल्याने त्यांनी मोबाईल विकण्याचे ठरविले. त्यासाठी ते जळगाव रेल्वेस्थानकावर उतरले. हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी त्यांचा माग काढत चौघांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com