Jalgaon Police Petrol Pump Scam
esakal
जळगाव
Jalgaon Police Petrol Pump Scam : 'वाघा'नं पेट्रोलपंपच गिळला! तब्बल 1 कोटी 33 लाखांवर डल्ला मारून व्यवस्थापक पसार, पळून गेलेल्या वाघाची पोलिस दलात दहशत कायम
What Happened at the Jalgaon Police Vigilance Petrol Pump? जळगाव पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोलपंपावर १.३३ कोटींची अफरातफर उघडकीस आली आहे. व्यवस्थापक वाल्मीक वाघ फरार असून गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे.
जळगाव : जिल्हा पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक वाल्मीक मधुकर वाघ हा एक कोटी ३३ लाख ७५२ रुपयांवर डल्ला मारून पसार झाला आहे. जगात कुठल्याही पेट्रोलपंपावर (Jalgaon Police Vigilance Petrol Pump) रोखीने व्यवहार चालतो. विक्री होणारे इंधन, आलेली रक्कम, त्याचा नफा हे पंप बंद करण्यापूर्वीच डोळ्यासमोर असते. असे असताना तब्बल दहा महिने व्यवस्थापक निवांत कुरण चरत राहिला आणि कुणालाही संशय कसा आला नाही. तर याची वेगवेगळी कारणे आता समोर येऊ लागली आहेत. गुन्हे शाखा त्याचा कसून शोध घेत आहे. तर दोन दिवसांत पंप चालू होणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले आहे.
