Barricades erected to restrict traffic on national highways due to potholes.esakal
जळगाव
Jalgaon Road Damge: भुसावळ-दीपनगर मार्गावर खड्डेच खड्डे! एकतर्फा रहदारी; अल्पावधीच्याच बांधकामाबाबत वाहनधारकांत संताप
Jalgaon News : संबंधित विभागाअंतर्गत या महामार्ग क्रमांक सहाचे रूंदीकरण, चौपदरीकरण, डांबरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांत मोठ्या जोमात करण्यात आले होते.
भुसावळ : मोठा गाजावाजा करीत सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण तरसोद ते चिखली या टप्प्यातील काम सुरू करण्यात आले. परंतु, अल्पवधीतच या महामार्गावर भुसावळ ते दीपनगर क्षेत्रात व उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
त्यामुळे महामार्ग प्रशासनाने रेल्वे उड्डाणपुलावरील रहदारी वळवून एकतर्फा केली आहे. गेल्या तीन-चार माहिन्यांपासून या खड्ड्यांमधून वाहन नेताना वाहनधारकांसह प्रवाशांमधून या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित करून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Potholes on Bhusawal Deepnagar road one way traffic)

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)