Jalgaon Garlic Rate : लसूण आवाक्यात; गृहिणींना दिलासा

Jalgaon Garlic Rate : मागील काही दिवसांपूर्वी अडीचशे प्रति रुपये किलो दिल्या जाणाऱ्या लसणाचे भाव कमी झाले असून, चांगल्या प्रतीचा लसूण आता बाजारात १५० रुपये किलो दराने मिळत आहे.
Consumers while buying vegetables in the market.
Consumers while buying vegetables in the market.esakal

Jalgaon Garlic Rate : मागील काही दिवसांपूर्वी अडीचशे प्रति रुपये किलो दिल्या जाणाऱ्या लसणाचे भाव कमी झाले असून, चांगल्या प्रतीचा लसूण आता बाजारात १५० रुपये किलो दराने मिळत आहे. त्यामुळे भाजीच्या फोडणीतून गायब झालेला लसून याचा समावेश झाल्याने गृहिणींनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर कमी प्रतीचा लसूण शहरात महामार्गालगत भोंगा लावून शंभर रुपये किलो प्रमाणे विकला जात असल्याचे दिसून येत आहे. (Jalgaon price of garlic down and good quality garlic is now available in market at Rs 150 per kg)

कोणतीही भाजी म्हटली म्हणजे लसणाशिवाय त्याला स्वाद येत नाही. मात्र, अवकाळी पावसाचा फटका यामुळे लसणाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे चांगल्या प्रतीचा लसूण बाजारपेठेत २५० ते २८० रुपये किलो दराने विकला जात होता. त्यामुळे बाजारपेठेत गृहिणी लागेल तितकाच तसेच ठराविक भाजीत तो वापरला जात होता.

त्यामुळे लसणाशिवाय चव येत नव्हती. मात्र आता लसणाचे भाव प्रति किलोमागे ७० ते ८० रुपये कमी झाल्याने गृहिणी याबाबत समाधान व्यक्त केले असून, घरात तो एक ते दीड किलो संग्रही ठेवला जात आहे. दरम्यान, भाजीपाल्याचे दर स्थिर असल्याचे विक्रेते भिका महाजन यांनी सांगितले. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारात दररोज लसणाची आवक होत आहे.

त्यामुळे लसणाचे दर कमी-जास्त होत आहेत. मागील दोन महिन्यापूर्वी लसणाचे भाव अडीचशे ते तीनशे रुपये किलोपर्यंत गेले होते. मात्र, आता लसणाची आवक वाढल्याने दरांत मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यंदा महाराष्ट्रात गावरान लसणाची लागवड कमी होत असल्याने परराज्यातील लसणाला मागणी वाढली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. (latest marathi news)

Consumers while buying vegetables in the market.
Nashik Pomegranate Rates Fall: डाळिंबाची लाली पडली फिकी! इतर फळांची आवक झाल्याने दरावर परिणाम

हिरवी मिरचीचा तिखटपणा वाढला

दरम्यान, रविवारी (ता. २४) संपूर्ण भारतात होळी उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी नैवेद्य देऊन संकल्प उपासना केली जाते. त्या पार्श्वभूमीवर घरात गोड नैवेद्यसह मिरचीची भाजी तसेच मिरची मिश्रित अनेक पदार्थ केले जातात. त्या पार्श्वभूमीवर हिरवी मिरचीचा तिखटपणा वाढला असून, आज ती बाजारात ८० रुपये प्रति किलोने विकली जात होती.

"ऐन सणासुदीच्या काळात लसणासह इतर भाजीपाल्याचे भाव स्थिर असल्यामुळे समाधान वाटते. मात्र खाद्यतेल वाढल्यामुळे गृहिणींचा बजेट कोलमडल्याचे दिसून येते."- शीतल मिस्तरी, गृहिणी, पारोळा

Consumers while buying vegetables in the market.
Jalgaon Lok Sabha Election : भाजपचा बालेकिल्ला फोडण्याचे शिवसेना ठाकरे गटासमोर आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com