Jalgaon News : भडगाव ‘एम. एच. 54’; शासनाकडून आरटीओ कार्यालयाला मान्यता

Jalgaon : भडगाव येथील प्रस्तावित असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
RTO
RTO esakal

Jalgaon News : अखेर भडगाव येथील प्रस्तावित असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. आता भडगावचा नोंदणी क्रमांक ५४ असणार आहे. दोन दिवसापूर्वीच चाळीसगाव येथे ‘आरटीओ’ कार्यालय मंजूर झाले होते. त्यानंतर आज भडगावात रास्ता रोकोसह बंद पुकारण्यात आला होता. मात्र, भडगाव येथेही उपप्रादेशिक कार्यालयाला मंजुरी मिळाल्याने भडगाव तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे. 9proposed sub regional transport office at Bhadgaon has received approval from government)

जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावरील वाढता ताण पाहता, त्या कार्यालयाच्या विभाजनाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर २०१० मध्ये शासनाकडून भौगोलिकदृष्ट्या योग्य असलेल्या भडगाव तालुक्याचा नवीन कार्यालयासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

मध्यंतरी हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित होता. या आठवड्यातच चाळीसगाव येथे ‘आरटीओ’ कार्यालयाला मंजुरी मिळाल्याच्या बातम्या झळकल्याने भडगावात असंतोषाची लाट उसळली होती. अखेर आज शासनाकडून भडगाव येथे जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मान्यता देण्यात आली. (latest marathi news)

RTO
Jalgaon News : भुसावळ विभागातील स्थानकांचा होणार पुनर्विकास

चाळीसगावला ‘एम. एच. ५२’ भडगावसाठी ‘एम. एच. ५४’ नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे भडगावची देशभरात नव्याने ओळख झाली आहे.

पाच तालुक्यांसाठी कार्यालय

भडगाव येथे नव्याने मान्यता देण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला भडगावसह पाचोरा, पारोळा, अमळनेर व एरंडोल तालुका जोडण्यात येणार आहे. येथील कार्यालयाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहतील याशिवाय इतर आवश्यक पदे शासनाकडून भरली जातील. मात्र, तूर्त इतर कार्यालयातून समायोजनाने ही पदे भरली जाणार आहे. आज भडगावला ‘आरटीओ’ कार्यालय मंजूर झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.

RTO
Jalgaon Unseasonal Rain Damage : चाळीसगाव तालुक्यातील 63 गावांमध्ये नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com