
Jalgaon Rain News : तब्बल आठवडाभराच्या खंडानंतर सोमवारी (ता. १९) जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले. सात ते आठ दिवस पाऊस नसल्याने जिल्ह्यातील पिकांची वाढ खुंटून ती पिवळी पडू लागली होती. मात्र, योग्य वेळी पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाल्याचे मानले जात आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस पडत आहे. (Rain again week torrential in evening)