जळगाव: भावा-बहिणीच्या पवित्र नात्याची ओळख सांगणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांची झालेली गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. जळगाव बसस्थानकातील सर्व बसगाड्या प्रवाशांनी फुल्ल भरून जात असल्याचे चित्र शनिवारी (ता.९) पाहावयास मिळाले. त्यामुळे गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनीही बसस्थानक भरलेले होते.