
रावेर : शहरासह परिसरात मंगळवारी (ता.१७) गणेश विसर्जन मिरणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात २५ सार्वजनिक गणेश मंडळ तर ग्रामीण भागात २० सार्वजनिक गणेश मंडळाकडून श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरात २५ सार्वजनिक गणेश मंडळ श्री विसर्जन करणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील रसलपूर, खिरवड, आभोडा, आहीरवाडीसह ग्रामीण भागात देखिल सुमारे २० सार्वजनिक गणेश मंडळचे उद्याच विसर्जन होणार आहे. (Raver Immersion by 25 Ganesh Pandals today )