Amrut Yojana: जळगावकरांना डिसेंबरअखेर मिळणार अमृत योजनेचे पाणी; जुनी लाइन होणार बंद

water supply
water supplyesakal

Amrut Yojana: शहरातील अमृत एक योजनेंतर्गत सुरू असलेले काम आता अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत शिवाजीनगरमधील काही भाग वगळता पूर्ण शहराला अमृत योजनेचे पाणी मिळणार आहे.

त्यामुळे जुनी पाइपलाइन बंद होणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. (Jalgaon residents will get Amrit Yojana water by end of December news)

अमृत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अमृत योजनेच्या टप्पा दोनचा सविस्तर प्रकल्प अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यात काही त्रुटी निघाल्यामुळे हा अहवाल परत पाठविण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने अहवालातील त्रुटी दूर करून पुन्हा तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला आहे.

प्राधिकरणाकडून हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे जाणार असून तेथून राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. जानेवारी २०२४ अखेरपर्यंत अमृत योजनेच्या टप्पा दोनच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश दिले जाऊ शकतात. त्यामुळे शहरातील सर्व नळांना मीटर बसविण्यात येऊन पुढच्या दिवाळीपर्यंत संपूर्ण शहराला २४ तास पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.

water supply
Amrut Yojana : ‘अमृत’च्या नळ कनेक्शनसाठी नवीन रस्त्यांवर खोदकाम सुरूच; जिल्हापेठ ठाण्यासमोर खोदला रस्ता

रेल्वेशी होणार करारनामा

अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले आहे. शिवाजीनगरमधील ३० टक्के भाग वगळता संपूर्ण शहरात ‘अमृत'चा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘अमृत'च्या पहिल्या टप्प्यातील ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ८० हजार नळ कनेक्शन दिले गेले आहेत.

परंतु शिवाजीनगरमधील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी रेल्वे ‘क्रॉसिंग'चे काम अद्याप झालेले नसल्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता त्या अडचणी मार्गी लागल्या असून लवकरच रेल्वेशी करारनामा करून रेल्वे ‘क्रॉसिंग'चे काम पूर्णत्वास येणार आहे. मात्र, तोपर्यंत शिवाजीनगरमधील ३० टक्के भाग वगळून शहरातील अमृत योजना सुरू करण्यात येणार आहे.

water supply
Amrut Yojana: 23 कोटींची ‘अमृत’ योजना मंजूर! सिन्नरच्या कानडी मळा, लिंगटांगवाडीसह उपनगरांचा पाणीप्रश्‍न सुटणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com