Jalgaon Banana Crop : वाढत्या तापमानामुळे केळी बागा करपल्या; प्रचंड उष्णतेचा केळी पिकला फटका

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात यंदाही चढ्या तापमानामुळे नागरिकांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असून, वाढत्या उष्ण झळांचा फटका शेती पिकांनाही बसू लागला आहे.
A banana orchard drying up due to rising temperatures.
A banana orchard drying up due to rising temperatures.esakal

धानोरा : जळगाव जिल्ह्यात यंदाही चढ्या तापमानामुळे नागरिकांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असून, वाढत्या उष्ण झळांचा फटका शेती पिकांनाही बसू लागला आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे केळी पिकांची वाताहत झाली असून, केळीबागा करपू लागल्या आहेत.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धानोरा परिसरात केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. शेतकरी काही दिवसांपासून केळीचे खोड लागवड करण्यापासून त्याची रासायनिक व सेंद्रीय खते देऊन त्याचे पालन पोषण करीत आहेत. केळी पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतात.

मात्र, यंदा वाढलेल्या तापमानामुळे केळी बागा जळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या पारा ४० ते ४५ अंशापर्यंत गेला आहे व हवेत प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

A banana orchard drying up due to rising temperatures.
Jalgaon News : ‘त्या’ कर्मचारी भरतीस स्थगितीसह चौकशीही होणार!

वाऱ्यामुळे केळीची पाने पूर्णतः फाटत आहेत. उष्णतेमुळे संपूर्ण केळीबागा जळताना दिसत आहेत. यात विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खोल जात असल्याने पिकाला पाणी देणे अनिश्चित झाले आहे. पिकला पाणी कमी पडल्यामुळे पिके जळू लागली आहेत.

शेतकऱ्यांनी काढलेला या वर्षीचा फळपीक विमासाठी ते उष्णतेच्या निकषात पात्र ठरत असून, लवकरात लवकर विमा कंपनीने केळी पिकाचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

A banana orchard drying up due to rising temperatures.
Jalgaon Lok Sabha Constituency : विरोधकांच्या तोंडी विकासाची नव्हे, शिव्यांची भाषा : फडणवीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com