Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

Newlywed Bride Dies Just Two Days After Marriage : जळगावजवळील वराड येथे वाहनाचे चाक निखळल्याने झालेल्या भीषण अपघातात लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत नववधूसह तिघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले.
newlywed bride accident in jalgaon

newlywed bride accident in jalgaon

esakal

Updated on

जळगाव : लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच नववधूवर काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना घडली. माहेरी पहिल्या ओवाळणीसाठी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात (Jalgaon road accident latest news) नववधू पूजा रवी वाघळकर (वय २२) हिच्यासह तिचे काका जगदीश चंद्रभान वाघळकर (५२) आणि मामा दत्तू तुळशीराम भागवत (वय ५२, सर्व रा. महाकालीनगर, अकोला) यांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (ता. २९) सकाळी सुमारे नऊला वराड (ता. धरणगाव) गावाजवळ घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com