Jalgaon Road Repair Fund : 2 कोटी 80 लाखांतून रस्त्यांची कामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Road Repair Fund : 2 कोटी 80 लाखांतून रस्त्यांची कामे

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेतर्फे शासकीय निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाने मूलभूत विकास निधीतून दोन कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला असून, त्यातून शहरातील प्रभाग ११ मधील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यात येतील. (Jalgaon Road Repair Fund Road works from 2 crore 80 lakhs jalgaon News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : हिवाळ्याची चाहूल अन् सिन्नररांची मैदानावर गर्दी!

महापालिकेने शहरातील विविध भागांतील कामासाठी मूलभूत विकास निधीतून दहा व दोन कोटी ८० लाख रुपयांच्या कामांचे प्रस्ताव पाठविले होते, तर इतर निधीतून पाच कोटींचे प्रस्ताव पाठविले होते. त्यातील पाच व दहा कोटींच्या निधीत काही त्रुटी असल्यामुळे शासनाने हे प्रस्ताव परत पाठविले आहेत. त्यातील त्रुटी काढल्यानंतर हे प्रस्ताव परत पाठविण्यात येणार आहेत. या निधीतून रस्ते, नाला दुरुस्ती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा प्रस्ताव व इतर कामे करण्यात येणार आहेत.

शासनाने मूलभूत विकास निधीतून दोन कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकातं सोनगिरे यांनी दिली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, की या निधीतून प्रभाग ११ मधील कोल्हेनगरमधील रस्त्यांची कामे करण्यात येतील.

हेही वाचा: Nashik News: नदीपात्रात शोधाव्या लागतात मोकळ्या जागा; नगररचना आराखड्यात जागा शिल्लक नसल्याचा परिणाम