Rohini Khadse News : बोगस बियाणे विक्रीला तातडीने आळा घालावा : ॲड. रोहिणी खडसे

Rohini Khadse : शेतकरी बांधवांचा पेरणीपूर्व शेतीमशागतीच्या कामांना वेग आला असून, पूर्व हंगामी कपाशी लागवड आणि खरीप हंगामाला सुरवात होण्याची स्थिती आहे.
Adv. Rohini Khadse
Adv. Rohini Khadseesakal

Rohini Khadse News : शेतकरी बांधवांचा पेरणीपूर्व शेतीमशागतीच्या कामांना वेग आला असून, पूर्व हंगामी कपाशी लागवड आणि खरीप हंगामाला सुरवात होण्याची स्थिती आहे. अशात बाजारात बोगस बियाण्यांसह खत विक्री करणारे घटक सक्रिय होत असून, त्यावरील नियंत्रणासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर यांनी केली आहे. ( Rohini Khadse statement on Sale of bogus seeds should be stopped immediately )

यासंदर्भात ॲड. रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. खरीप हंगामासाठी शेतकरी राजा सज्ज झाला असून, त्यादृष्टीने शेतकऱ्यांची लगबग व तयारी सुरू आहे.

या मागण्यांचा उल्लेख

शेतकऱ्यांना पेरणीसाठी दरवर्षी लाखो रुपयांची बी- बियाणे, खते, कीटकनाशके कृषी केंद्रातून विकत घ्यावे लागतात. मात्र, शेतकरी बांधवांची लगबग त्यांचे अज्ञान या बाबी हेरून बोगस बी-बियाणे व खते विक्री करणाऱ्या कंपन्या सक्रिय होतात. बोगस बियाणे, खते विक्री करून शेतकऱ्यांना फसवले जाते. जिल्ह्यात काही ठिकाणी बोगस बियाणे आणि बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यात बोगस खत विक्री झाल्याचे आढळून आले होते.

संबंधित कंपनीवर ठोस कारवाई झालेली नाही, तसेच संबंधित कंपन्यांकडून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यासाठी प्रशासकीय स्तरावरून उचित कार्यवाही करून संबंधित कृषी व इतर विभागांना योग्य ते निर्देश देऊन बोगस बी-बियाणे व खते विक्रीला आळा घालावा. बोगस बियाण्यांची खतांची विक्री होत असल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास तक्रार करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी. (latest marathi news)

Adv. Rohini Khadse
Eknath Khadse News : केळीवरील ‘सीएमव्ही’च्या मुद्द्यावर खडसे आक्रमक; विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न

मागील हंगामातील पीकविमा मंजूर होऊनही काही तांत्रिक बाबीमुळे बहुतांशी शेतकरी बांधवांना अद्याप पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पीकविम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करून तत्काळ विम्याचा लाभ देण्यात यावा.

बोदवड तालुक्यात टंचाई

बोदवड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असून, नागरिकांचे, गुरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. पाणीटंचाईवर करण्यात येणाऱ्या विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, अशा उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

त्यासाठी तालुक्यातील गावांमध्ये तातडीने या सर्व उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, अजय बढे, हितेश जावळे, चेतन पवार आदी उपस्थित होते.

Adv. Rohini Khadse
Rohini Khadse : शरद पवारांना सोडणे मला न पटणारे ; ॲड. रोहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com