.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्र्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. इच्छादेवी चौक ते सेंट टेरेसा स्कूल रस्ता बंद राहील, त्यामुळे शिरसोली- पाचोऱ्याकडे जाणारी लहान वाहने काव्यरत्नावली चौक- महाबळ- संभाजीचौक मार्गे जातील. तर कोर्ट चौक ते भिलपुरा चौक रस्ताही दिवसभरासाठी बंद राहणार असल्याने असोदा- भादलीकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने जावे लागेल. विर्सजन मिरवणुकीच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हा पो.िलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. (rush for immersion procession traffic routes in city have been changed)