While repairing potholes on the highway.
While repairing potholes on the highway.esakal

SAKAL Impact : अखेर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू; दीपनगरपासून उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती

SAKAL Impact : शहराला भेदून जाणाऱ्या आणि नव्याने चौपदरीकरण झालेल्या सुरत - नागपूर महामार्ग क्रमांक ५३ वर ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत.
Published on

भुसावळ : शहराला भेदून जाणाऱ्या आणि नव्याने चौपदरीकरण झालेल्या सुरत - नागपूर महामार्ग क्रमांक ५३ वर ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. यासंदर्भातील 'सकाळ'ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची महामार्ग प्रशासनाने दखल घेत संबंधित कंत्राटदारांमार्फत दीपनगर उड्डालपुलापासून उखडलेल्या सर्व मार्गाचे नव्याने काम सुरू केले आहे. दरम्यान, ‘सकाळ’ने सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडल्याने हा प्रश्न सुटत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (Finally work of filling potholes on highway has started )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com