Jalgaon News : सावदा, किनगाव येथील रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

Jalgaon : सावदा येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.
Hospital building at Savada, Kingaon
Hospital building at Savada, Kingaonesakal

Jalgaon News : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा (ता. रावेर) येथे नवीन ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे आणि किनगाव (ता. यावल) येथे नवीन ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे उद्या (ता.२५) दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

असे आहे सावद्याचे रुग्णालय

सावदा येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.

या ग्रामीण रुग्णालयाची इमारत ३० खाटांची असून दोन मजली आहे. त्यात तळमल्याचे क्षेत्रफळ १८ हजार चौरस फूट एवढे आहे व पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ ११ हजार ३०० चौरस फुट असे २९ हजार ३०० चौरस फुटाची इमारत आहे.

तळ मजल्यावर प्रसूती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग, आयुष बाह्य रूग्ण विभाग, लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत.अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकूण २४ असून वर्ग-१ चे एक, वर्ग-२ चे तीन, वर्ग-३ चे आठ व वर्ग-४ चे १२ निवासस्थान आहे.

Hospital building at Savada, Kingaon
Jalgaon News : ग्राहकांनी वाळूची मागणी अशी नोंदवावी

किनगाव ग्रामीण रुग्णालय

किनगाव (ता. यावल) येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय २०१८-१९ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते. या इमारतीचे तळमजल्याचे क्षेत्रफळ १३ हजार २५० चौरस फूट आहे व पहिल्या मजल्याचे क्षेत्र १३ हजार ५० चौरस फूट असे २६ हजार ५०० चौरस फुटाची ची इमारत आहे.

तळ मजल्यावर प्रसूती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक, डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थिएटर, रिकव्हरी रूम, पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग, आयुष बाह्य रूग्ण विभाग, लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत. या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी निवासस्थान १२ असून वर्ग-२ चे चार, वर्ग-३ चे आठ निवासस्थान आहे. अशाप्रकारे आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

Hospital building at Savada, Kingaon
Jalgaon News : शासकीय डेपोतून 1 लाख ब्रास वाळू उपलब्ध होणार; 600 रुपये दर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com