

Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
esakal
जळगाव : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या जागा पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचालींना आता वेग येण्याची चिन्हे आहेत. अंजिठा चौफुलीजवळील भंगार बाजारातील अतिक्रमित दुकाने बुधवारी हटवून सुमारे सव्वा ते दीड एकर जागा पंचनामा करून महापालिकेने ताब्यात घेतली. त्या परिसरातील प्रचलित व्यावसायिक दरानुसार या जागेचे मूल्य सुमारे ७० ते ९० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर आता महामार्गालगतची महापालिकेच्या मालकीची ट्रान्स्पोर्ट नगरची जागाही चर्चेत आली असून, तीही ताब्यात घेण्याच्या दिशेने महापालिका पुढे जाण्याची शक्यता आहे.