Jalgaon News : महामार्गालगतचा सर्व्हिस रोड वाहनधारकांसाठी धोकादायक! संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष

Jalgaon News : सर्व्हिस रोडवर सर्रासपणे मोठमोठे ट्रक उभे केले जात आहेत. रात्री उभी वाहने दिसत नसल्याने अपघाताची भीतीही बळावली आहे.
Heavy vehicles still on the service road on both sides of the highway in front of the power plant.
Heavy vehicles still on the service road on both sides of the highway in front of the power plant.esakal

भुसावळ : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भुसावळ तालुक्यामधून मार्गक्रम केलेल्या सुरत-नागपूर या महामार्गाची दुरवस्था दूर झाली खरी मात्र, रस्त्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीच काळजी घेतली जात नाही. दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पाबाहेर ट्रक व इतर अवजड वाहने महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण करून उभी केली जात आहेत.

त्यामुळे महामार्गाच्या मूळ उद्देशालाच या वाहनधारकांकडून हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. तरीदेखील याकडे संबंधित यंत्रणेचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. सर्व्हिस रोडवर सर्रासपणे मोठमोठे ट्रक उभे केले जात आहेत. रात्री उभी वाहने दिसत नसल्याने अपघाताची भीतीही बळावली आहे. (Jalgaon service road next to highway dangerous for motorists)

सुरत-नागपूर महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण, रुंदीकरण व मजबूतीकरण नुकतेच करण्यात आले. काही ठिकाणी काम प्रगतीपथावरदेखील आहे. महामार्गाचे डांबरीकरण झाल्याने वाहन चालविताना कंटाळवाणा प्रवास होत नाही. उड्डाणपुलांसह या रस्त्याच्या रुंदीकरणाचे म्हणजे चौपदरीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाच्या एजन्सीजधारकाने पूर्ण केले.

पाठोपाठ या रस्त्यावर ठिकठिकाणी सर्व्हिस रोड व मुख्य रस्त्यावर खांब उभारून पथदिवेसुद्धा कार्यान्वित केले आहेत. पथदिव्यांच्या प्रकाशामुळे रस्ते उजळून निघाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील दुतर्फा व्यापाऱ्यांसह त्या भागात लांबपर्यंत पसरलेल्या वसाहतीमधील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परंतु, या चौपदरी रस्त्याला दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड तयार केलेले आहेत. मात्र, सर्व्हिस रोड केवळ वाहने उभी करण्यासाठीच आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महामार्गाला लागूनच भुसावळ येथे दीपनगर औष्णिक वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पात कार्यरत असलेली अवजड वाहने महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर रात्रंदिवस उभी असतात. (latest marathi news)

Heavy vehicles still on the service road on both sides of the highway in front of the power plant.
Adani Group: अदानी समूहाने चिनी अभियंत्यांसाठी केली व्हिसाची मागणी; काय आहे प्रकरण?

वाहने नादुरूस्त झाल्यास याच ठिकाणी दुरूस्तदेखील केली जातात. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांनी या रस्त्यावरच अतिक्रमण करून वाहने उभी केली आहेत. कधीकधी मालाची वाहतूक करणारे ट्रकदेखील याच सर्व्हिस रोडवर सर्रासपणे उभी केली जातात.

त्यामुळे रात्रीच्या वेळी आधीच या मार्गावर अंधार असतो. त्यात अशी मोठी वाहने उभी राहत असल्याने अपघाताला आमंत्रणच दिले जात आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाने व संबंधित विभागांनी या अनधिकृत थांबा घेतलेल्या वाहनांवर कारवाई करून महामार्गाचे सर्व्हिस रोड मोकळे करावेत, अशी मागणी केली जात आहे.

गांभीर्याने दखल घेण्याची गरज

या समस्यांबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने व गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याची भावना या भागातील वाहनधारकांसह नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या समस्यांबाबत संबंधित विभागातील यंत्रणेनेच स्वत:हून पुढाकार घ्यायला पाहिजे होता. मात्र, ही गंभीर समस्या असूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आली नसल्याने संतप्त भावनादेखील वाहनधारकांसह नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Heavy vehicles still on the service road on both sides of the highway in front of the power plant.
Mazagon Dock Shipbuilders Ltd : माझगाव डॉक शिपबिल्डर्सला नवरत्नचा दर्जा, नवरत्न दर्जा असणे म्हणजे काय ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com