Jalgaon News : वरणगाव पालिका कार्यालयाचे स्थलांतर! लवकरच नवीन इमारतीतून चालणार कारभार

Jalgaon : शहरातील जुन्या इमारतीमधील वरणगाव नगरपरिषदेचे कार्यालय स्टेशन रोड लगतच्या नवीन इमारतीमध्ये बुधवारपासून (ता. २७) जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर स्थलांतराला सुरवात करण्यात आली आहे.
New Building of Varangaon Municipality.
New Building of Varangaon Municipality.esakal

Jalgaon News : शहरातील जुन्या इमारतीमधील वरणगाव नगरपरिषदेचे कार्यालय स्टेशन रोड लगतच्या नवीन इमारतीमध्ये बुधवारपासून (ता. २७) जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर स्थलांतराला सुरवात करण्यात आली आहे. चावडीनंतर तत्कालीन ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावगाड्याचे काम या जुन्या इमारतीमध्ये सुरू होते. २०१४ मध्ये ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या कार्यकारी मंडळाने स्टेशन रोडलगत असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत विश्रामगृहाची जागा नगरपरिषदेकडे वर्ग करून घेतली होती. (Jalgaon Shifting of Varangaon Municipal Office)

त्या जागेवर नगरपरिषदेचे व्यापारी संकुल निर्माणीचे नियोजन होते. त्यासाठी नगरपरिषदेने कागदोपत्री पाठपुरावा देखील केला होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हा ठराव फिसकटून त्या ठिकाणी नगरपरिषदेच्या इमारतीसाठी १ कोटी ९४ लाख रुपये खर्चाची नगरविकास मंत्रालयाकडून मंजुरी मिळवून एका वर्षात पूर्ण झाली होती.

मात्र, शहरांत सर्वपक्षीय व नागरिकांची नगरपरिषद स्थलांतर विरोधी संघटना तयार झाली होती. संघटनेच्या म्हणण्यानुसार जुन्या गावातील नागरिकांना रेल्वेस्थानका जवळील नवीन इमारतीमधील नगरपरिषदेचे कार्यालय एक ते दीड किलोमीटर लांब अंतरावर असेल व समस्या अथवा कामे घेऊन येणाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी पायपीट होईल.

ज्येष्ठ नागरिकांची दमछाक होईल. त्यामुळे सदर नगर परिषद कार्यालय स्थलांतर करू नये, अशी मागणी संघटनेची आहे. मात्र नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शहराचा विस्तार होत आहे. आणि जुन्या इमारतीमध्ये वाहन स्थळाची व्यवस्था नाही. काम घेऊन येणाऱ्या नागरिक व पदाधिकाऱ्यांसह सभापतींना बसण्यासाठी व प्रशासक यांना स्वतंत्र दालनाची सोय नाही.

तसेच कर्मचाऱ्यांवर अंकुश राहण्यासाठी आणि अन्य बाबींच्या अभावामुळे एकंदरच कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्या मंजुरीनुसार कोट्यवधी रुपये खर्च केलेली नवीन इमारत धुळखात पडून होती. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभाग व स्वच्छतेचा आरोग्य विभाग जुन्या इमारतीमध्येच राहिल व नगरपरिषदेचे सर्व विभाग नव्याने उभारलेल्या स्टेशन रोडलगत नगरपरिषदेच्या नवीन इमारतीमध्ये शासन दरबारी पाठपुरावा करून हलविण्यात येत आहे. मात्र स्थलांतर विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. (latest marathi news)

New Building of Varangaon Municipality.
Jalgaon News : रंगपंचमी खेळून वाघूर धरणात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; 24 तासांनी सापडला मृतदेह

तसेच शहरातील सिद्धेश्वरनगर, मकरंद नगर, जगदंबानगर, शिवाजीनगर, रेणुका नगर, हनुमान नगर, लुबिनी नगर, वामन नगर, सम्राटनगर, प्रतिभा नगर, गंगाराम नगर, हिना पार्क, आंबेडकर नगर, कवाडे नगर, रामपेठ, गणपती नगर आदी नगरांतील नागरिकांना तसेच माहिलांना सुद्धा सदर नगर परिषदेच्या नवीन इमारतीमधील कार्यालयाजवळ व सोईस्कर ठरणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत खर्चासाठी प्रशासकीय वित्तीय मंजुरीनंतर नवीन इमारतीमध्ये प्लायवूड पार्टिशन, फर्निचर, कंम्प्युटरसेट, विद्युतीकरण, स्वच्छतागृह व अनुषांगिक कामे करण्यात आली आहेत तर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विविध विभागांचे सभापती, नगरसेवक, विविध विभागांचे विविध अधिकाऱ्यांचे विविध दालन ठेवणार असून, लवकरच नवीन कार्यालयातून कामकाजाला सुरवात होणार आहे.

"कर्मचाऱ्यांवर अंकुश राहण्यासाठी आणि अन्य बाबींच्या अभावामुळे एकंदरच कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसार कोट्यवधी रुपये खर्च केलेली नवीन इमारत धुळखात पडून होती. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभाग व स्वच्छतेचा आरोग्य विभाग जुन्या इमारतमध्येच राहिल व नगरपरिषदेचे सर्व विभाग नव्याने उभारलेल्या स्टेशन रोडलगत नगर परिषदेच्या नवीन इमारतमध्ये शासन दरबारी पाठपुरावा करून हलविण्यात येत आहे.- सचिन राऊत, मुख्याधिकारी, वरणगाव नगर परिषद

"वृद्ध व दिव्यांग तसेच नागरिकांच्या हितकारक दृष्टीने जुने नगर परिषदेचे कार्यालय स्थलांतरित करू नये, असा समितीच्या माध्यमातून आमदार, खासदार, मंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला आहे. नगर परिषदेने देखील प्रतिसाद दिला असून, नागरी हिताचे विभाग सोडून फक्त काहीच विभागांचे स्थलातर करीत आहे."- आशिष चौधरी, अध्यक्ष नगरपरिषद स्थलांतर विरोधी समिती

New Building of Varangaon Municipality.
Jalgaon Lok Sabha Election: जळगाव, रावेरमध्ये ‘महाविकास’च्या उमेदवारांचा तिढा कायम! नेत्यांकडून सक्षम पर्यायासाठी चाचपणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com