
चोपडा : विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राजू अमीर तडवी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी (ता. २८) पक्षाकडून तडवी यांच्याऐवजी आता प्रभाकर गोटू सोनवणे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडींबाबत ‘शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवार बदलण्याचे संकेत’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ने दिलेले वृत्त अखेर खरे ठरले आहे. (Shiv Sena has announced official candidate of Prabakar Sonwane for Chopda Assembly Constituency)