
Jalgaon Fire Accident : शहरातील शिवाजीनगर हुडको भागात वास्तव्यास असलेल्या धुणी-भांडी करणाऱ्या महिलेच्या घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील अन्नधान्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिंदे कुटुंबीयांचे घर जळाल्याने त्या धायमोकलून रडत असून, परिसरातील रहिवाशांतर्फे मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. (Shivajinagar Hudko short circuit fire)