Rising temperatures cause dryness on the roads
sakal
जळगाव - मागील दोन दिवसांपासून तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. यात आज तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडत ४१ अंश सेल्सीअसवर पोहोचला असून, उष्णतेची तीव्र लाट जाणवू लागली आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढत असून, दुपारच्या वेळी उकाडा असह्य होत आहे.