ओएलएक्सवर सोफासेट विकायला काढणे पडले महागात

आयटी इंजिनिअरला ७१ हजारांचा गंडा
OLX  Online Fraud in Jalgaon
OLX Online Fraud in Jalgaonsakal

जळगाव : ओएलएक्सवर सोफासेट विक्रीच्या नावाखाली ऑनलाइन क्यूआर कोड स्कॅन करत आयटी इंजिनिअरला ७२ हजाराला गंडविल्याचा प्रकार शनिवारी (ता. ५) घडला आहे. तालुका पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (OLX Online Fraud in Jalgaon)

OLX  Online Fraud in Jalgaon
धक्कादायक! खड्ड्यात पडून चार मुलांचा मृत्यू, अवैध वाळूचे बळी सुरुच

शहरातील गणेश कॉलनी परिसरात विशाल अशोक जाधव (वय २२) आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. जाधव आयटी इंजिनिअर असून, त्यांनी शुक्रवारी घरातील सोफासेट विक्रीसाठी ओएलएक्सवर त्याचे फोटो अपलोड केले होते. दुपारी पाचच्या सुमारास त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. ‘आपने जो ओएलएक्स पर सोफोसेट का ॲड डाला है, वो मुझे खरीदना है। मै कल तक मेरे वर्कर भेज देता हू.. कल तक वो आजायेंगे’, असे म्हणत त्या दोघांमध्ये बोलणे झाले. त्यांचा व्यवहार हा १२ हजार रुपयांत ठरल्याने विशालने त्याला ‘आप पेमेंट कैसे करोगे’, असे विचारले. यावर त्याने, ‘आपके पास पेटीएम है, मै पेटीएम से ही पेमेंट करुंगा’, असे म्हणून त्याने विशाल यांच्या व्हॉट्सअॅपवर त्याचे आधार कार्ड व पॅनकार्डचा फोटो टाकला. यावरून विशाल याला सोफा खरेदी करणारा तोच असल्याची खात्री झाली.

OLX  Online Fraud in Jalgaon
औरंगाबाद : दहावी, बारावीची परीक्षा केंद्रे दुपटीने वाढली

क्यूआर कोड स्कॅन करताच पैसे लंपास

खात्री झाल्यानंतर विशालला सायबर गुन्हेगाराने ‘क्यूआर कोड’ पाठविला. तो स्कॅन करताच त्याच्या खात्यातून सहा हजार रुपये कट झाल्याचा मॅसेज आला. याबाबत विचारले असता त्याने ‘माझ्याकडून चुकून झाले असून, तुम्ही परत क्यूआर कोड स्कॅन करा, मी तुमचे व माझे असे एकूण १२ हजार रुपये तुम्हाला पाठवितो’, असे सांगितले. त्यानंतर दोन वेळा कोड स्कॅन करताच विशालच्या खात्यातून १८ हजार, तर नंतर ३६ हजार असे एकूण ७१ हजार रुपये त्या भामट्याने ऑनलाइन लंपास करत गंडा घातला. त्या व्यक्तीने ७१ हजार लांबविल्यानंतर त्याने विशाल याला, ‘तुम्ही पुन्हा क्यूआर कोड स्कॅन करा, मी तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत करतो, असे सांगितले. परंतु विशाल याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी त्याने तक्रार दिली असून, त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com