जळगाव : जवानाची तीन गावांतून निघाली मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवान संतोष पाटील यांचे औक्षण करताना महिला.

जळगाव : जवानाची तीन गावांतून निघाली मिरवणूक

पारोळा - भारतीय सैन्यदलातील जवान संतोष रामदास पाटील हे २६ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर नुकतेच गावी परतले. या वेळी सेवापूर्तीनिमित्त गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. ते सैन्यदलात कोर ऑफ सिग्नलमध्ये एसीपी नायक सुभेदार या पदावर कार्यरत होते. सैन्यदलात प्रदीर्घ काळ सेवा केल्यानंतर जवान संतोष पाटील हे आपल्या गावी परतताच ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या वेळी खानदेशी रक्षक ग्रुपतर्फे सजावट केलेल्या वाहनातून त्यांची रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावातून बँडच्या तालावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. या वेळी देशभक्तीपर गीतांवर तरुणांनी नृत्यही सादर केले. कलशधारी महिला देखील सहभागी झाल्या होत्या. यात देशभक्तीपर गीतांच्या मनमोहक आवाजाने गाव दुमदुमून गेले होते. तिन्ही गावातून मिरवणूक झाल्यानंतर मारुती मंदिराच्या चौकात विशेष सभामंडप उभारण्यात आला होता. या सभामंडपात जवानाचे स्वागत, सत्काराच्या भव्य कार्यक्रम झाला. या वेळी विशेष मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. जवानाची आई खटाबाई पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला तर संतोष पाटील यांच्या अर्धांगिनी यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात शेकडो ग्रामस्थांनी तसेच नातेवाईकांनी सहभाग घेतला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, आर. व्ही. पाटील, पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामदास वाकोडे, सैन्यदलातील लहू भागवत, चंद्रकांत पाटील, दीपक धनगर, पोलिस दलातील प्रल्हाद पाटील, सरपंच सुनीता पाटील, उपसरपंच अंकुश भागवत, ग्रामपंचायत सदस्य संदीप भिल, ज्ञानेश्वर पाटील, मनोराज पाटील, चिंतामण पाटील रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Jalgaon Soldiers Marched Through Three Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top