जिल्‍हा परिषदेची विशेष सभा बारगळली | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्‍हा परिषद
जिल्‍हा परिषदेची विशेष सभा बारगळली!

जळगाव : जिल्‍हा परिषदेची विशेष सभा बारगळली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पंधराव्या वित्त आयोगाच्‍या निधीचे नियोजन तसेच रखडलेला वार्षिक प्रशासन अहवालातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांकडून करण्यात आली. मात्र, ही विशेष सभा बारगळली असून, आता शुक्रवारी (ता. १२) आयोजित स्‍थायी समिती सभेतच सदस्‍यांचा सहभाग असेल.

जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या कामांना मंजुरी घेणे. कामे करत नसलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचा ठराव करणे यासह विविध कामांसाठी जिल्हा परिषदेतील सत्‍ताधारी व विरोधकांनी एकमत करत विशेष सभा बोलावण्याची मागणी केली. सामान्‍य प्रशासन विभागाला त्‍याबाबत अध्‍यक्षा रंजना पाटील यांनी सांगितले देखील; मात्र विशेष सभेचा मुहूर्तच अद्याप सापडत नसल्‍याचे चित्र आहे.

हेही वाचा: रत्नागिरी : गणपतीपुळे आराखड्यातील बदल ठेकेदारधार्जिणे

सदस्‍यांची नाराजी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्‍हा परिषद प्रशासन विरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यावर एकमत झाले होते. विशेष सभा बोलावण्याविषयी जि. प. अध्यक्षांकडून प्रशासनाला सूचना दिल्या. मात्र, सभेचा अजेंडा काढण्यात आला नसल्याने विशेष सभेचा विषय लांबणीवर पडला आहे. या लांबत असलेल्‍या सभेबाबतही सदस्‍यांमध्‍ये नाराजी आहे. स्‍थायीत पुन्‍हा आवाज जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍थायी समितीची सभा शुक्रवारी (ता. १२) आयोजित केली आहे. या सभेत विशेष सभा आयोजनासंदर्भात तसेच पंधराव्या वित्त आयोगाचा निधीचे नियोजन व रखडलेल्‍या कामांबाबतच सदस्‍यांची आक्रमक भूमिका राहणार असल्‍याची शक्‍यता आहे.

loading image
go to top