Jalgaon Summer Fruit Business : तापमानाचा पारा चढला; उष्णतेमुळे फळांना मागणी! बाजारात आवक वाढली

Jalgaon News : या कडक वातावरणात रसाळ फळे, उसाचा रस, ताक, लस्सी आदी पेयांना पसंती मिळत आहे.
Fruits
Fruitsesakal

वावडे (ता. अमळनेर) : तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, मे हिटच्या तडाख्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. अशा या कडक वातावरणात रसाळ फळे, उसाचा रस, ताक, लस्सी आदी पेयांना पसंती मिळत आहे. (Jalgaon summer Temperature rises Demand fruits)

अमळनेरमधील घाऊक फळ बाजारात मोठ्या प्रमाणात फळे विक्रीसाठी दाखल होत असल्याने फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. बाजारात येणाऱ्या फळांचा रंग, दर्जा, चव उत्तम असल्याने ही फळे अमळनेरकरांच्या पसंतीस उतरली आहेत. सध्या फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला आहे.

शंभर ते दीडशे रुपये किलो भावाने आंबा मिळत आहे. कलिंगड स्वस्त फळ शिवाय उन्हाळ्यात उत्तम असल्याने बाजारात कलिंगडांना चांगलीच मागणी आहे. सफरचंदपासून पपईपर्यंत सर्वच फळे बाजारात उपलब्ध असून त्यांचे दरही थोडे कमी झाल्याने ग्राहकही सुखावले आहेत.

दरवर्षी नोव्हेंबरपासून बाजारात फळे येण्यास सुरवात होते. आता आंबे, द्राक्ष यांच्यासह पपई, पेरु, चिक्कू, कलिंगड, खरबूज या फळांची बाजारात चांगलीच आवक आहे. सफरचंदचा भाव १८० रुपये किलो आहे. मोठा कलिंगड ५० ते ८० रुपयांना आणि लहान कलिंगड ३० रुपयांना मिळतो. (Latest Marathi News)

Fruits
Pune Summer Heat : रात्रीच्या उकाड्यातून वाऱ्यामुळे सुटका ; पुण्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या खाली

असे आहेत फळांचे भाव

उन्हाळी फळांमुळे आरोग्य चांगले राहते. शिवाय जांभळे, करवंदे या रानमेव्याचा आनंद वेगळा असल्यामुळे फळांची मागणी वाढत आहे. फळांचे दर पपई (लहान) - ३० रुपये, पपई (मोठा) - ६० रुपये, केळी - ३० ते ४० रुपये डझन, चिक्कू प्रतिकिलो ६० रुपये, मोसंबी - १२० रुपये किलो, खरबूज ३० रुपये नग, द्राक्ष ८० रुपये किलो, सफरचंद - १६० ते १८० रुपये किलो असे दर आहेत. यात उन्हाळा दिवसेंदिवस कडक वाढत आहे.

Fruits
Summer Heat : एप्रिल महिना ठरला सर्वाधिक उष्ण ; ‘सी-३ एस’चा अहवाल,सलग अकराव्या महिन्यात उच्चांकी तापमान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com