जळगाव : नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला करा निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Suspend police inspector Ravindra Patil

नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला करा निलंबित

मुक्ताईनगर : चाळीसगाव शहरात पोलिस निरीक्षकाने चालू कीर्तनात नारदाच्या गादीवर बुटासह जाऊन कीर्तनकार, टाळकरी उपस्थितांना अर्वाच्य भाषेत दमदाटी केली. या घटनेनेबाबत वारकरी व भाविकांत प्रचंड संताप असून संबंधित पोलिस निरीक्षकास तातडीने निलंबित करण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष व जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केली आहे.

चाळीसगावला कीर्तन सुरु असताना दहा वाजून पाचच मिनिटे झाली होती. पोलिस अधिकाऱ्याने सामोपचाराने आयोजकांना समज दिली असती किंवा गुन्हा दाखल करायला मोकळे असते. परंतु तसे न करता त्यांनी थेट बुटासह नारदांच्या गादीवर जाऊन अर्वाच्य भाषा वापरून धमकी दिली त्यामुळे वारकरी समाज व भाविक यांच्यात संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. संबंधित के. के. पाटील पोलिस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे करणार असल्याचे रवींद्र पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Jalgaon Suspend Police Inspector Ravindra Patil Statement Dilip Walse Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top