Jalgaon Drought News : जामनेर तालुक्यात 8 गावांना टँकर; पहूरचे गोगडी धरण कोरडेठाक

Jalgaon Drought : मे महिना अर्ध्यावर आला असून, जामनेर तालुक्याला दुष्काळाच्या झळा पोहोचू लागल्या आहेत.
Rapidly depleting water supply from the project. The month of May is half over and the waves of drought are beginning to reach Jamner taluk
Rapidly depleting water supply from the project. The month of May is half over and the waves of drought are beginning to reach Jamner talukesakal

Jalgaon Drought News : मे महिना अर्ध्यावर आला असून, जामनेर तालुक्याला दुष्काळाच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. तालुक्यातील आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जात असून, तब्बल १४ गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आले आहेत. पहूर कसबे, पहूर पेठ आणि सांगवी या तीन गावांची तहान भागविणाऱ्या गोगडी प्रकल्पाने तळ गाठला असून, धरणात केवळ मृत साठा शिल्लक आहे. (Tanker to 8 villages in Jamner taluka )

तथापी शेतकरी बांधवांकडून प्रचंड पाणी उपसा होत असल्याने गावावर पाणीटंचाईचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. शेतकरी बांधवांनी आपले वीज पंप काढण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने यापूर्वीही केले आहे. मात्र त्यास फारसा प्रतिसाद न मिळाल्याने सरपंच आशा जाधव ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी तहसीलदारांकडे वीजपंप काढण्यासाठी शुक्रवारी (ता . १७) निवेदन दिले.

गोगडी प्रकल्प यावर्षीही शंभर टक्के पूर्ण भरलेला होता. गावाची वाढती लोकसंख्या आणि शेतशिवारातील पिके वाचविण्यासाठी होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशामुळे ‘मे हिट’च्या तडाख्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

या गावांना टँकरचा आधार

तालुक्यातील तीन गावांना चार एप्रिलपासूनच टंचाईच्या झळा पोचायला सुरवात झाली. मे महिन्याच्या मध्यात पाच गावांची त्यात भर पडली असून, टंचाईग्रस्त गावांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. रोटवद, मोरगाव, काळखेडे, एकुलती खुर्द, एकुलती बुद्रुक, वाकोद, जांभूळ, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, हिंगणे, नक वाडी, नाचनखेडा, सार्वे या गावांची टँकरद्वारे तहान भागिविली जात आहे. (latest marathi news)

Rapidly depleting water supply from the project. The month of May is half over and the waves of drought are beginning to reach Jamner taluk
Nashik Drought News : हंडाभर पाण्यासाठी महिलांची हेंडसाळ; पावसाच्या माहेरघरीच नियोजन नाही

नैसर्गिक स्रोत आटण्याच्या मार्गावर

नदी, नाले, तलाव यासह नैसर्गिक स्रोत आटण्याच्या मार्गावर असून, वन्य जीवांसाठी कृत्रिम पानवठे तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोनाळा वन विभागात असलेल्या पाणवठ्यांवर माकड, हरिण, ससे, रोही, मोर यासह वन्य जीव पाणी पिण्यासाठी येतात. मात्र हा पानवठा आटत चालला आहे.

विहीर अधिग्रहणाचे १४ गावांना ‘ग्रहण’

बोरगाव, खडकी, रोटवद, मोरगाव, नांद्रा प्र.लो., काळखेडे, वडगाव बुद्रुक, एकुलती बुद्रुक, एकुलती खुर्द, मोयखेडे दिगर, सार्वे, नाचणखेडा, वाडी, किन्ही, नांद्रा हवेली, बिलवाडी या गावांमधील विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.

''पहूरसह परिसर पाणीटंचाईच्या सावटाखाली आहे. लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता तसेच तहसीलदार, जामनेर यांना गोगडी प्रकल्पावरील वीजपंप काढण्यासाठी निवेदन दिले. लवकरच वीज पंप काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.''- विक्रम घोंगडे, ग्रामपंचायत सदस्य

''उन्हाळ्यात प्राधान्याने पिण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने शेतकरी बांधवांनी आपले वीजपंप काढून घ्यावे, अन्यथा प्रशासकीय कारवाई करून वीजपंप काढण्यात येतील.''- शुभम पाटील, कनिष्ठ अभियंता, लहू पाटबंधारे उपविभाग, जामनेर

''सर्व जनतेने पाण्याचा गैरवापर टाळणे महत्त्वाचे आहे. धरणांवरील वीजपंप काढण्यासाठी आम्ही त्वरित कार्यवाही करणार आहोत.''- प्रशांत निंबोळकर, निवासी नायब तहसीलदार, जामनेर

Rapidly depleting water supply from the project. The month of May is half over and the waves of drought are beginning to reach Jamner taluk
Jalgaon Drought News : कीर्तनाचे मानधन गायींच्या पालनपोषणावर खर्च! तालुक्यात चारा छावण्यांची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com