रेखांकित गवती वटवट्याचे तापी परिसरात दर्शन

पक्षी पाहुणा नाही; स्थानिक असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा
Jalgaon Tapi river in Bhusawal city Striated Grassbird eBird
Jalgaon Tapi river in Bhusawal city Striated Grassbird eBirdsakal

जळगाव : भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रातील गवताळ बेटावर रेखांकित गवती वटवट्या Striated Grassbird (Megalurus palustris) या पक्ष्याची प्रथमच नोंद झाली आहे. पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ या दांपत्याला हा पक्षी आढळून आला असून, दुर्मिळ अनुभव असल्याचा दावा त्यांनी केला आहे.या पक्ष्याची प्रजात ही रेखांकित गवती वटवट्या असल्याची खात्री ‘eBird’ चे पक्षीतज्ज्ञ अभिजित आवटे यांनी दिली. तर त्याचा आवाज हा breeding song असून, विणीचा हंगाम सुरू झाल्याचे ते द्योतक असल्याची माहिती पक्षी अभ्यासक गिरीश जठार यांनी श्री. गाडगीळ दांपत्याला दिली.

यापूर्वी पक्षी अभ्यासक लक्ष्मीकांत नेवे यांनी BTPS या भागात याची नोंद घेतलेली आहे. तसेच रेकॉर्ड केलेला त्याचा आवाज हा breeding Song आहे, हे स्पष्ट झाल्यामुळे अन्य स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे हा हिवाळी पाहुणा नाही, तर आपल्या जळगाव जिल्ह्यात तापी नदी काठच्या परिसरात त्याचा निवास असून, त्याची नियमित वीण देखील होते आहे. याला पुष्टी मिळत असल्याचे पक्षी अभ्यासक शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले.

...या भागात आढळतो

भारतातील मध्य भारतात, तसेच पूर्वांचल अर्थात हिमालय पायथ्याचा उत्तर-पूर्व पट्टा आणि आपल्या आसाम, मणिपूर अशा सेव्हन सिस्टर प्रांतात गवताळ, झुडपी व दलदलीच्या प्रदेशातील हा पक्षी निवासी आहे. याशिवाय भारतीय उपखंडातील बांगलादेश, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, फिलिपाइन्स या देशात आढळतो.

...असा दिसतो पक्षी

डोके आणि गळ्याखाली छातीवर उभ्या रेषा आणि तपकिरी पंखांवर काळ्या ठळक रेषा, पांढरी भुवई आणि अन्य वटवट्यांच्या तुलनेत याची शेपटी लांब असते. नर-मादी दिसायला एकसारखे असतात. फक्त नर मादीपेक्षा आकाराने थोडा मोठा असतो. मुख्य अन्न म्हणजे गोगलगायी, छोटे कोळी, कीटक व त्यांच्या अळ्या हे असते. गवताची पाती व अन्य साहित्य वापरून चेंडूसारखे गोल आकाराचे घरटे तो करतो, असे गाडगीळ दांपत्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com