"कोण होणार करोडपती" या कार्यक्रमात जिंकले साडेबारा लाख रुपये

Sachin Khedkar & Jayashree Pawar
Sachin Khedkar & Jayashree Pawaresakal

अमळनेर (जि. जळगाव) : ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमात जिंकलेले साडेबारा लाख रुपये आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे अशक्य असणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर (Students Education) खर्च करणार आहे, अशी माहिती जळोद (ता. अमळनेर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका (ZP Teacher) जयश्री पवार-पाटील यांनी दिली. (jalgaon teacher jayashree pawar won Twelve lakh rupees in program kon honar crorepati Jalgaon News)

सोनी मराठी वाहिनीवर (Sony Marathi Channel) ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन जयश्री पाटील यांनी साडेबारा लाख रुपये जिंकले. या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी खानदेशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या कार्यक्रमात त्यांनी साने गुरुजी, बहिणाबाई, बाबा आमटे, नरेंद्र दाभोलकर, शिक्षण महर्षी नानासाहेब झेड. बी. पाटील यांचा चर्चेत आवर्जुन उल्लेख केला. मागीलवर्षी कोरोनाच्या लाटेत जयश्री पाटील यांच्या आईंचे निधन झाले होते, त्याचा उल्लेख आला असता, सचिन खेडेकर व श्रोते काही वेळ भावनिक झाले होते.

Sachin Khedkar & Jayashree Pawar
कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश : आरोग्य विभाग सतर्क

आपण जिंकलेले पैसे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्याची मनीषा व्यक्त करून त्यांनी त्या खरोखरच आदर्श शिक्षिका असल्याचे कृतीतून दाखवून दिले. जयश्री पाटील या अमळगाव (ता. अमळनेर) येथील प्रगतिशील शेतकरी (कै.) आर. आर. पाटील यांच्या स्नुषा असून, दहिवद (ता. अमळनेर) येथील नवभारत विद्यालयातील प्रा. संदीप पाटील यांच्या पत्नी, जयहिंद हायस्कूलचे निवृत्त आदर्श शिक्षक व युवक क्रांती दलाचे साथी दिलीप पवार यांच्या कन्या, तर पुणे येथील नादमुद्रा ग्रुपचे संचालक तथा प्रसिद्ध गायक धनंजय पवार यांच्या भगिनी आहेत. या यशाबद्दल त्यांचा खानदेश साहित्य संघ, शिवशाही फाउंडेशन, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्र सेवा दलाचे गो. पी. लांडगे यांनी सत्कार केला.

Sachin Khedkar & Jayashree Pawar
कृषी विभागाच्या छाप्यात बोगस बियाणे जप्त; 3 दिवसात दुसरी कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com