Jalgaon Lok Sabha Election : भर उन्हातही अमळनेरला मतदारांत उत्साह; निवडणूक यंत्र बंद पडल्याने मतदारांची तुरळक गैरसोय

Lok Sabha Election : विधानसभा मतदार संघात उन्हाची तीव्रता कायम असूनही मतदानात उत्साह होता.
Crowd for voting in Gandhalipura area of ​​the city
Crowd for voting in Gandhalipura area of ​​the cityesakal

Jalgaon Lok Sabha Election : विधानसभा मतदार संघात उन्हाची तीव्रता कायम असूनही मतदानात उत्साह होता. सकाळी मॉक पोल करताना मतदान केंद्रावर एक बॅलेट युनिट , दोन कंट्रोल युनिट आणि एक व्ही व्ही पॅट खराब झाले होते. लागलीच ते बदलून देण्यात आले. तर दुपारी मतदान प्रक्रिया सुरू असताना तीन व्ही व्ही पॅट मशिन खराब झाले. मात्र लागलीच ते बदलण्यात आले. रात्री १२ ते १ वाजेपर्यंत मतदान साहित्य जमा करण्यासाठी अनेक कर्मचारी थांबलेले होते. ( excitement in assembly constituency despite continued heat of summer )

महिलांनी सकाळी घरची कामे बाजूला सारून आधी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. रुबजी नगर , गांधलीपुरा , बारा नंबर शाळा आदी भागात मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. महिला केंद्र , युवा केंद्र ,आदर्श केंद्रांवर मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. वृद्ध दांपत्य देखील सेल्फी काढल्याशिवाय परतत नव्हते. अंगणवाडी सेविका ,बचत गटाच्या महिला ,आशा मतदान करण्यासाठी आग्रही होत्या. (latest marathi news)

Crowd for voting in Gandhalipura area of ​​the city
Jalgaon Lok Sabha Election : जळगाव, नंदुरबारमध्ये आज मतदारांचा फैसला! लोकसभेच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

अनेक महिला आपल्या लहान बाळांना घेऊन मतदानाला आल्याने मतदान प्रक्रियेच्या कालावधीत पाळणा घरात आशा , अंगणवाडी सेविका त्या लहान मुलांना आनंदाने खेळवत व सांभाळताना दिसून आल्या. पळासदळे येथे दोन मतदारांची सारखी नावे असल्याने टिक मार्क दुसऱ्याच्या नावावर झाल्याने दुसऱ्याच्या जागेवर मतदान झाले म्हणून थोडा वेळ गोंधळ झाला होता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी भेट दिल्यानंतर तणाव निवळला.

मतदान यंत्रात बिघाड

अमळनेर येथील १९३ क्रमांकाच्या केंद्रांवर कंट्रोल युनिट खराब झाले ते बदलण्यात आले. पिंपळे बुद्रुक येथील २१७ क्रमांकाच्या केंद्रावरही कंट्रोल युनिट खराब झाले होते. पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथील २९८ क्रमांकाच्या केंद्रांवर बॅलेट युनिट खराब झाल्याने बदलवण्यात आले. बहादरवाडी येथील व्ही.व्ही.पॅट मशिन खराब झाले होते. तसेच मतदान सुरू झाल्यानंतर जैतपिर येथील २० नंबरच्या केंद्रांवर व्ही.व्ही.पॅट खराब झाले होते. २९९ केंद्र महाळपूर व १२६ केंद्र टाकरखेडे येथे व्हीवी पॅट मशीन खराब झाले होते. मात्र प्रशासनाने तातडीने मशिन बदलून निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवली.

Crowd for voting in Gandhalipura area of ​​the city
Jalgaon Lok Sabha Election : चोपडा मतदारसंघांत नव मतदारांचा उत्साह; आदिवासी भागातही मतदानाचा टक्का वाढला..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com