Jalgaon News : गिरणा धरणातून आज तिसरे आवर्तन सुटणार; दाहकतेने हैराण जळगावकरांना आजपासून दिलासा

Jalgaon News : 'गिरणा' धरणातून दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. गिरणापट्टा पाण्यासाठी कासावीस झाला आहे.
Jalgaon Girna Dam
Jalgaon Girna Damesakal

भडगाव : गिरणा पट्ट्यासाठी ऐन उष्णतेच्या लाटेत एक आनंदाची बातमी आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्या ( ता. ७) सकाळी सहाला 'गिरणा' धरणातून दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. गिरणापट्टा पाण्यासाठी कासावीस झाला आहे. त्यामुळे सर्वाचे लक्ष गिरणा धरणातून केव्हा आवर्तन सोडण्यात येते याकडे लागले होते. 9Jalgaon Third cycle will be released from Girna Dam)

निम्मा जळगाव जिल्ह्याची पाण्याची तहान गिरणा धरणावर अवलंबून आहे. यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने धरणातून फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. उद्या धरणातून तिसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. गिरणा पट्ट्यात सध्या तिव्र पाणीटंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या ( ता. ७) रोजी सकाळी सहाला गिरणा धरणातून २००० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

कानळदापर्यंत पाणी

गिरणा धरणातून २००० क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. ते कानळदापर्यंत असणार आहे. त्यामुळे गिरणा काठावरील गावांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. सद्य:स्थितीला काठावरील गावांना मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाचोरा शहरात तर पाणी टंचाई जाणवते आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे गिरणा नदी एकदाही वाहून निघाली नाही. त्यामुळे पाणी पातळीत मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. पर्यायाने काठावरील पाणीपुरवठ्याच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे गणित पुरते कोलमडून गेले आहे.

धरणात ३१ टक्के पाणीसाठा

'गिरणा'धरणात सद्य:स्थितीला ५ हजार ७३० दशलक्ष घनफूट एवढा म्हणजेच ३०.९७ एवढा पाणीसाठा आहे. तर हा जिवंत पाणीसाठा सोडून ३००० हजार दशलक्ष घनफूट एवढा मृत साठा आहे. या आवर्तनासाठी १ हजार ४०० दशलक्ष घनफुट तेवढे पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सर्वसाधारणपणे धरणातून २००० क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. (latest marathi news)

Jalgaon Girna Dam
Jalgaon Protest News : भुसावळला ट्रकखाली डोके ठेवून आंदोलन! सणासुदीत रस्त्याचे खोदकाम केल्याने ‘रास्ता रोको’

चौथे आवर्तन मे महिन्यात

यंदा गिरणा धरणातुन बीगर सिंचनासाठी चार आवर्तन सोडण्यात आलेला आहेत. आतापर्यंत दोन आवर्तन सोडण्यात आलेले आहेत. तर उद्या तिसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. तर मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात चौथे आवर्तन सोडता येणार आहे. सद्यःस्थितीत धरणात ३०.९७ टक्के पाणीसाठा आहे.

एका आवर्तनाला १०-१२ टक्के पाणीसाठा लागतो. त्यामुळे हे आवर्तन सोडल्यानंतर १८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. मे महिन्यात चौथे आवर्तन सुटल्यानंतर ही ७-८ टक्के पाणीसाठा धरणात राहील. त्यामुळे पावसाळा लांबल्यास जून मधे ही पाचवे आवर्तन सुटू शकते.

गिरणा धरणावरील योजनेवर चाळीसगाव नगरपरिषद, जळगाव महापालिका, नांदगाव व ५६ खेडे व दहिवाळ व २५ गावांची योजना आहे. याशिवाय भडगाव, पाचोरा १७५ योजना अवलंबून आहेत. आवर्तनाला १४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.

Jalgaon Girna Dam
Jalgaon District Bank : जिल्हा बँकेच्या धोरणामुळे गटसचिवांना घरघर

"पिण्यासाठी गिरणा धरणातून उद्या तिसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेती पंप बंद ठेवावेत. तर नदीकाठावरील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. पाणी जपून वापरावे."-देवेंद्र अग्रवाल (कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे जळगाव)

गिरणा धरण दृष्टीक्षेपात

- गिरणा धरणाची क्षमता - २१५०० दशलक्ष घनफूट

- मृतसाठा - ३००० दशलक्ष घनफूट

- सध्याचा उपयुक्त पाणीसाठा - ५७३० दशलक्ष( मृतसाठा वगळून)

- धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी - ३०.९७

- धरणावरील योजनांना लागणारे पाणी - १२२० दशलक्ष घनफूट

Jalgaon Girna Dam
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com