Jalgaon Unseasonal Rain Damage: जामनेर तालुक्याला वादळाने झोडपले! केळी, लिंबाच्या बागा आडव्या; अनेक घरांचे नुकसान

Jalgaon News : शहरासह तालुक्याला मंगळवारी (ता. ९) दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अचानक सुरू झालेल्या तुफान वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले.
A crop overturned by a storm in the field & The world that came to light when the letters on the house were thrown
A crop overturned by a storm in the field & The world that came to light when the letters on the house were thrownesakal

जामनेर : शहरासह तालुक्याला मंगळवारी (ता. ९) दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अचानक सुरू झालेल्या तुफान वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे शेतामधील उभी केळी तर आडवी झालीच शिवाय लिंबूसह मका, ज्वारी, गहू आदी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले.

सोबतच काहींच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंसह अन्य सामानही ओलेचिंब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Jalgaon Unseasonal Rain Damage Storm lashed Jamner taluka demolished banana lemon orchards houses damaged marathi news)

तालुक्यांतील खडकी-बोरगाव, महुखेडा, लोणी, आमखेडा, सावरला, तळेगाव आदी गावांना या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जामनेर शहरातही दहा ते पंधरा मिनिटे दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. मात्र वादळी वाऱ्याची तीव्रता कमी असल्याने कोठेही मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनस्तरावर रात्री उशिरापर्यंत आली नाही.  (latest marathi news)

A crop overturned by a storm in the field & The world that came to light when the letters on the house were thrown
Dhule Unseasonal Rain : धुळ्यासह तालुक्यात ‘शॉवरिंग’; अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे बळीराजाला चिंता

मंत्र्यांसह तहसीलदारांकडून पाहणी

पावसाने नुकसान झाल्याची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने खडकी-बोरगाव परिसर आणि तळेगाव- आमखेडा, गारखेडा परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी तहसीलदार नानासाहेब आगळेंसह अधिकारीवर्ग उपस्थित होता.

या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मंत्री महाजनांनी अधिकाऱ्यांना दिले. या झालेल्या नुकसानीची राज्य शासनाने दखल घेतली असून, पीडितांना आवश्यक सर्व ती मदत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

A crop overturned by a storm in the field & The world that came to light when the letters on the house were thrown
Jalgaon News: सराफ बाजारात सोने विक्रीत घट, दरवाढीचा परिणाम! गुढीपाडव्याला वाहन, घरे, वस्तूंच्या विक्रीत कोट्यवधींची उलाढाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com