
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्थापितांसह अपक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी (ता. २५) अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील पाचोऱ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे वैशाली सूर्यवंशी यांनी अर्ज भरला. जळगाव शहर मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाचे कुलभूषण पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरला, तर काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने रावेरचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहंमद यांनीही बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. एरंडोलमधून भगवान महाजन यांनी अपक्ष अर्ज भरला. (Vaishali Suryawanshi filled application in Pachora along with application of founders )